जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट )
आगामी जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या धर्तीवर आज जामखेड शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इच्छुक उमेदवार, नेते आणि कार्यकर्ते, यांची बैठक सामाजिक कार्यकर्ते अँड.यशवंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली , व पक्ष निरीक्षक मा. रामभाऊ मरगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. मा.रामभाऊ मरगळे यांची पक्षनिरिक्षकपदी निवड झाल्यानंतर आज पहिलीच बैठक जामखेड येथिल ग्रामीण विकास केंद्र या ठिकाणी पार पडली. यावेळी येथे जेष्ठ नेते,कार्यकर्ते इच्छुक उमेदवार, यांचे आगामी नगरपरिषद निवडणुकी बाबतीत मत मतांतरे जाणून घेण्यात आली. या प्रसंगी वंचीत बहुजन आघाडीचे भटके- विमुक्त आघाडीचे राज्य समनव्यक अँड. डॉ अरुण जाधव यांनी मा.रामभाऊ मरगळे यांचे स्वागत केले. वंचित बहुजन युवा आघाडीचे सचिन जोरे ,जिल्हाप्रमुख (दक्षिण) प्रतीक बारसे, उपप्रमुख संतोष गलांडे ,लोकअधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहळ, अँड.यशवंत गायकवाड यांनी आपले मत व्यक्त केले व सर्वांनी हातात हात मिळवत पक्षादेश पाळण्याचे व अँड. डॉ अरुण जाधवांच्या माध्यमातून जामखेड नगर परिषदेच्या 21 जागा स्वबळावर लढवून जामखेड नगर परिषदेची सत्ता हस्तगत करुन विकासाची गंगा आणण्याचे एकमत झाले.
मा. रामभाऊ मरगळे यांनी आपल्या भाषणात पक्षनिरीक्षकपदी निवड केल्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले.जामखेड नगरपरिषदेच्या बाबतीत पक्षाच्या प्रदेश स्तरावरून घेण्यात आलेला स्वबळाचा निर्णय मान्य करत आपल्याला स्वबळावर निवडणूक लढवायची आहे असे प्रतिपादन निरीक्षक रामभाऊ मरगळे यांनी केले.शहराच्या प्रत्येक भागात तुल्यबळ नेते,कार्यकर्ते आहेत हे विधानसभेच्या मतांवरून जाणवते,प्रत्येकाने येत्या काळात निवडणूक पक्षाद्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघून निवडणूक लढली पाहिजे, वंचितांची सत्ता जामखेड नगरपरिषदेवर यावी हे अँड.डॉ अरुण जाधव यांचे स्वप्न उराशी बाळगून आपल्याला नगर परिषदेची सत्ता कशी हस्तगत करता येईल या दृष्टीने मार्गक्रमण करावे लागेल.कार्यकर्त्यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडीचे काम करण्याचे अवाहन केले, वंचित समूहाला सत्तेत बसवण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब अहोरात्र झटत आहे.याचा वंचित समूहाने विचार करावा असे प्रतिपादन अँड.अरुण जाधव यांनी केले.तसेच वंचित बहुजन आघाडीशिवाय सत्तेचं समीकरण बसणार नाही हे प्रस्थापितांनि लक्षात घ्याव असा सूचक इशारा यावेळी जाधव यांनी दिला प्रसंगी ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांनी नाराजी न बाळगता दिलेल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करायच आहे.अस आवाहन अँड.जाधव यांनी केलं.
उपस्थित उमेदवारांचे म्हणणे वैयक्तिक रित्या जाणून घेत,ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांचे हि मत महत्वाचे असून तेहि जाणून घेण्यात आले.याप्रसंगी जिल्हा महासचिव योगेश साठे, उपजिल्हाप्रमुख योगेश सदाफुले, बौद्ध महासभेच्या तालुका अध्यक्ष सुरेखाताई सदाफुले, तरडगावच्या नवनिर्वाचित सरपंच संगीताताई केसकर, बाळगव्हानचे उपसरपंच राहुल गोपाळघरे,वाकी चे माजी सरपंच बाळासाहेब खाडे, बाळासाहेब गायकवाड ,भीमराव चव्हाण, अरुण डोळस,विशाल पवार,विशाल जाधव,गणेश घायतडक,पुष्पराज सदाफुले, नवनाथ सदाफुले, किशोर सदाफुले, मच्छीन्द्र जाधव, दत्ता समुद्र,कल्याण आव्हाड ,सुरेश आव्हाड,बाबासाहेब सोनवणे,अतुल वाघमारे,अमोल घायतडक,अक्षय समुद्र,निखिल पवार,दिनेश ओहळ ,अजिनाथ शिंदे ,राजू शिंदे, सचिन भिंगारदिवे,सागर भांगरे,राकेश साळवे,आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष चव्हाण यांनी केले तर आभार अरुण डोळस यांनी मानले.