जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
जामखेड तालुक्यातील लोणी येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अंतर्गत श्री संत गजानन महाविद्यालय खर्डा यांचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष शिबिर समारोप कोराणाचे नियम पाळत झाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद जाधव, सरपंच रघुनाथ परकड ,माजी सरपंच सिद्धेश्वर शेंडकर, ग्रामपंचायत सदस्य छगन पवार, बिबीशन परकड ,हारून शेख, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संतोष थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ महेश गोलेकर यांच्य मार्गदर्शना खाली विद्यार्थ्यांनी विशेष शिबिरांमध्ये लोणी गावांमध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबवून कोरोना या संसर्गजन्य आजारांची जनजागृती करून ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझर साहित्याचे वाटप केले. गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे अंतर्गत येणारे विविध कार्यक्रम मुलांनी सोशल डिस्टंसिंग चा व कोरोनाचा प्रतिबंध उपायांचा तंतोतंत पालन करून नियमांचे पालन करून राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संपन्न झाले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार करताना आर्ट ऑफ लिव्हिंगचे संतोष थोरात यांनी शिबिराथी यांनी केलेल्या कामाचे ग्रामस्थांच्या कौतुकाचे माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात यशस्वी होण्याचे कानमंत्र दिले. गाव समृद्ध करण्यासाठी जलसंधारण, आरोग्य, निसर्ग सौदर्य वाढवणे, वृक्ष लागवड, महीला सबलीकरण, व्यसनमुक्ती, स्रीभ्रूनहत्या, ग्रामस्वच्छता,बचतगट स्थापन, शैक्षणिक आदी विविध सामाजिक विषयावर मार्गद्शन केले. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी शिवानी वाघे सह अनेक विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त करून शिबिर मधील अनुभव व्यक्त केले. लोणी येथे झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ सोशल डिस्टंसिंग चे नियमांचे काटेकोरपणे पालन करून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी सोयल शेख यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक मोसिन शेख यांनी व्यक्त केले.