जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
जिल्ह्यातील रेखा जरे हत्येचा मुख्यसूत्रधार बाळ बोठे याला पकडण्यासाठी तेलगंना राज्यातील हैद्राबाद येथे जाऊन त्या आरोपीच्या मुसक्या आवळल्यात जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या टिमने महत्त्वाची भूमिका बजावली या कर्तव्यदक्ष अधिकार्याचा सत्कार जामखेड महिला दक्षता समितीच्या वतीने करण्यात आला. बाळ बोठे यास पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यामध्ये जामखेड पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व हेडकॉन्स्टेबल अविनाश ढेरे,संग्राम जाधव आदींची महत्वाची भूमिका बजावली होती .रेखा जरे या महिलेची हत्येचा सूत्रधार याला अटक केल्याने महिलांना न्याय मिळाला असल्याने पोलिस दक्षता समितीच्या महिलानी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी अंजली लक्ष्मण ढेपे, रेखा अजय अवसरे, आरती दिपक देवमाने, मपोना.अनिता निकत, मपोकॉ.अनुराधा अशोक घुगरे, डॉ. मयूरी सागर शिंदे, डॉ. स्वाती वराट, सविता विजयसिंह गोलेकर, स्नेहल दिगंबर फुटाणे, कीर्ती रविंद्र कडलग, अनिता काळे,अर्चना बाजीराव घोडके, रुकसाना झाकीर पठाण, सारिका एकनाथ माळी, वसुदा नितिन शेटे,आदी उपस्थित होते.