मोहा येथे दुर्गा देवीच्या मूर्तीची भिमराव कापसे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा
मोहटादेवी ते मोहा पायी ज्योतीचे आयोजन
जामखेड प्रतिनिधीजामखेड न्युज——
मोहा येथे दुर्गा देवीच्या नवीन मुर्तीची प्राणप्रतिष्ठा मोहा गावचे ग्रामपंचायत सदस्य भिमराव कापसे व विकास सांगळे यांच्या हस्ते करत वाजत गाजत आलेल्या ज्योतीचे व मुर्तीचे आई राजा…. उदो उदो…. म्हणत गावातील महिला व गावकरी मंडळींनी उत्स्फूर्त स्वागत केले.
नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची मोठी परंपरा आहे प्रत्येक घरात धुणी, भांडी व घरांची स्वच्छता महिला भगिनींनी केली आहे.
मोहा गावात ज्योतीचे आगमन झाल्यावर प्रत्येक ठिकाणी महिलांनी ज्योतीची पूजा करून दर्शन घेतले, त्यानंतर घराघरात देवीची घटस्थापना करण्यात आली. नवरात्र उत्सवात आरादी मंडळींनी अनेक धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नऊ दिवसांपर्यंत केले आहे.
या कार्यक्रमाचा मनमुरादपणे आनंद घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत सदस्य भिमराव कापसे यांनी केले.
कोरोनाच्या महामारीनंतर यावर्षी नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे त्यामुळे तालुक्यातील सर्वच भाविक भक्तांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
सदर ज्योतीचे आयोजन करण्यासाठी भिमराव कापसे यांनी वाहने व सर्व भक्तांना जेवणाची व्यवस्था केली होती. यावेळी वैभव गायकवाड, संदिप डोंगरे, संजय कापसे, लक्ष्मण गायकवाड, सदाशिव डोंगरे, दिपक वाघमारे, गणेश डोंगरे, सचिन बेलेकर, प्रविण गायकवाड, विकास गायकवाड, प्रविण माऊली बांगर, मयुर गायकवाड, हनुमान माळी, अंकुश झेंडे, सोमनाथ नवगिरे, अक्षय गायकवाड, रतन गायकवाड, आजिनाथ कुदळे, लोन्या गायकवाड आदी कार्यकर्त्यांसह अनेक युवक ज्योत आणण्यासाठी सहभागी झाले होते.