आमदार रोहित पवारांचा असाही दातृत्वपणा!!! मुलगा व मुलीच्या नावाने गीतेबाबाच्या मठाला दहा लाखाचा निधी

0
182

 

जामखेड न्युज——

आमदार रोहित पवारांचा असाही दातृत्वपणा!!!

मुलगा व मुलीच्या नावाने गीतेबाबाच्या मठाला दहा लाखाचा निधी

पंढरपूर येथील गीतेबाबाच्या मठास आमदार रोहित पवारांतर्फे मुलगा व मुलीच्या नावाने दहा लाखाचा निधी

श्री संत गीते बाबा महाराज पंढरपूर येथील मठास आमदार रोहितदादा पवार यांच्या परिवाराच्या वतीने दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध

 

याबाबत माहिती अशी की, श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री संत गीते बाबा महाराज मठास आमदार रोहित दादा पवार यांनी त्यांची मुलगी व मुलाच्या नावाने दहा लाख रुपयांचा निधी स्वतः उपस्थित राहून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर माऊली जळगावकर, वारकरी,फडकरी, दिंडी संघटनेचे अध्यक्ष संजय महाराज देहुकर यांच्या उपस्थितीत श्री संत गीते बाबा महाराज मठाचे मठाधिपती महालिंग नगरे महाराज यांचे कडे सुपूर्द केला. तसेच उर्वरित कामासही पुढील काळात आणखी निधी देणार असल्याचे आमदार पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

खर्डा येथील सिताराम बाबा गडाचे मठाधिपती महालिंग महाराज नगरे यांनी पंढरपूर येथे श्री संत गीते बाबा महाराज यांच्या मठाचे काम 2000 साली सुरू केले होते, त्यानंतर एक वर्षां नंतर ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आले,त्या ठिकाणी सध्या भक्तनिवास,भोजन व्यवस्था, कीर्तन व भजन यासाठी ते वारकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. नंतर या मठास जागा कमी पडत असल्याचे महालिंग महाराज यांनी आमदार रोहितदादा पवार यांच्या लक्षात आणून दिले याचे अवलोकन करून आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे दिनांक 24 सप्टेंबर रोजी मठास समक्ष भेट देऊन पुढील बांधकामास स्वखर्चाने दहा लाख रुपयांचा निधी देऊन प्रत्यक्ष कामासही सुरुवात करून दिली, त्यामुळे पंढरपूर येथील भक्तगणामधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रसंगी पंढरपूर येथील प्रकाश भोसले, गर्गे सर,विजयसिंह गोलेकर, विष्णु महाराज कबीर, डॉक्टर योगेश रणदिवे, भागवत महाराज जळगावकर, बाळासाहेब महाराज उखळीकर, भागवत हांडे, ज्ञानेश्वर महाराज नंदनकर, बापू महाराज गीते, माऊली महाराज चव्हाण, प्रकाश गोलेकर, हरिभाऊ गोलेकर, दिलीप आजबे,दत्ता होनमाने पाटील,नितीन गोलेकर, महादेव ढगे, सुभाष आजबे, गणपत पाचरकर, श्रीराम गीते, संतोष गीते, महालिंग शिंगणापूरकर,शिवा आटकरे, सागर अंकुश, नामदेव पैठणकर इत्यादी सह भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार महालिंग नगरे महाराज यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here