जामखेड प्रतिनिधीजामखेड न्युज——दहा हजाराचे झाले दोन लाख, खाजगी सावकारासह चार जणांवर अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल
दहा हजार रुपये मुद्दल देऊन त्याचे व्याजासह झालेले दोन लाख रुपये दे आसे म्हणत जामखेड येथिल एस टी बस स्थानकाजवळुन एका रीक्षा चालकाचे तीन ते चार जणांनी चारचाकी गाडीतून अपहरण करत मारहाण केली. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला एका सावकारासह एकुण चार जणांविरोधात अपहरण व सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पप्पु कात्रजकर (पुर्ण नाव माहीत नाही) रा. कुसडगाव आसे आरोपीचे नाव आहे. तसेच आरोपी सोबत इतर अनोळखी आसलेल्या तीन जणांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी आबेद खलील शेख वय ३५ वर्षे धंदा रिक्षा चालक रा. सदाफुले वस्ती ,ता.जामखेड हा दि २५ सप्टेंबर रोजी साडेआठ वाजता जामखेड येथिल बस स्टँड जवळ रीक्षा शेजारी उभा राहिला होता. या वेळी आरोपी पप्पु कात्रजकर(पुर्ण नाव माहीत नाही) व इतर तीघे जण त्या ठिकाणी आले व म्हणाले की तु माझ्या कडून व्याजाने दहा हजार रुपये घेतले आहेत. त्याचे तुझ्याकडे व्याजासह दोन लाख रुपये राहिले आहेत ते मला आत्ताचे आत्ता पाहीजेत आसे म्हणाले.
या नंतर मला पैसै लगेच दे आसे म्हणून फिर्यादीस त्यांनी आणलेल्या पांढर्या रंगाच्या चार चाकी गाडी नंबर एम एच १६ सी सी …७२.(गाडीचा पूर्ण नंबर माहित नाही) या मध्ये बळजबरीने बसवले व फीर्यादी आबेद खलील शेख यास मारहाण केली. तसेच कुसडगाव येथिल एका हॉटेलवर घेऊन गेले व त्या ठिकाणी देखील आरोपींनी फीर्यादीस बेल्टने मारहाण व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.
या प्रकरणी फीर्यादी आबेद खलील शेख याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पप्पु कात्रजकर (पुर्ण नाव माहीत नाही) व इतर तीन अनोळखी यांच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अपहरण, मारहाण व सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी सुनील बडे हे करत आहेत.