जामखेड न्युज——
नॅशनल कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते पै. संजय तनपुरेचा काॅमनवेल्थ स्पर्धेपर्यतचा सर्व खर्च करणार- आमदार रोहित पवार
जामखेडला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल उभारणार
संघर्ष मित्र मंडळाचा उत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून सन्मान
तालुक्यातील कुस्ती पटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाची कामगिरी बजावता यावी, यासाठी सराव करण्याची सुविधा मिळण्यासाठी शहरात नगरपरिषदेमार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाचे माती व मॅटचे कुस्ती संकुल उभारण्यात येणार असून येणाऱ्या काळामध्ये तालुक्यांमध्ये निश्चितच अजून चांगले पैलवान घडतील व राज्य राष्ट्रीय पातळीवर आपली चुणूक निश्चितच ते दाखवतील. असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
माजी नगरसेवक मोहन पवार, मातोश्री क्रीडा संकुल व लाल आखाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने महावीर भवन येथे आ.रोहित पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य नागरी सत्कार, गुणवंत खेळाडूंचा सन्मान व गणेश मंडळ बक्षिस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता तत्पूर्वी पै.संजय तनपुरे याने नॅशनल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल तपनेश्वर रोड,खर्डा चौक,नगर रोड येथून बैलगाडीमधून मिरवणूक काढण्यात आली होती.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रकाश हसनाळकर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे,माजी नगरसेवक मोहन पवार, दादासाहेब सरनोबत,मंगेश आजबे.सुंदरदास बिरंगळ.शरद शिंदे,अमोल गिरमे,.लहु पवार,पै सुरज पवार.बाळासाहेब आवारे,महादेव कात्रजकर.प्रसन्न कात्रजकर, बाळासाहेब खैरे, विठ्ठल देवकाते राजू सय्यद, इस्माईल सय्यद, ताहेर खान, इस्माईल शेख ,शाकीर पठाण, ऋषिकेश नेटके,वशिम सय्यद उमेश माळवदकर, नामदेव राळेभात, संतोष घोलप.दिपक तुपेरे.जितेंद्र आढाव या मान्यवरांसह राजकीय सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक व कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गणेशत्सवात आयोजित करण्यात आलेल्या उत्कृष्ठ गणेश मंडळ स्पर्धेमध्ये कोर्ट रोड वरील संघर्ष मित्र मंडळाने ११ हजाराचे प्रथम क्रमांक पडकवला,त्याचबरोबर द्वितीय क्रमांक युवा प्रतिष्ठान, तर तृतीय क्रमांक
समता तरुण मंडळ व शिवराणा मित्र मंडळ यांना बक्षीस विभागून देण्यात आले यावेळी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला