मुले पळविणारी टोळी या अफवांवर विश्वास ठेवू नये -पोलीस अधीक्षक मनोज पाटील

0
212

जामखेड न्युज——

मुले पळविणारी टोळी या अफवांवर विश्वास ठेवू नये -पोलीस अधीक्षक मनोज पाटील

जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी ‘मुले
पळविणारी टोळी’ या अफवेवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन केलेले आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा जुने काही व्हिडिओ आणि छायाचित्रांमधे तोडफोड करून समाज माध्यमावर संदेश पसरवून जनतेमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्यात येत आहे.

जनतेस आवाहन करण्यात येते की, याबाबत पोलीस सतर्क असून कोणतीही परिस्थिती हाताळण्याची तयारी करण्यात आली आहे. अशा कुठल्याही प्रकारची टोळी सक्रिय झालेली नाही. जर आपल्या परिसरामध्ये कोणी संशयित मिळून आल्यास त्यास कुठल्याही प्रकारची मारहाण न करता पोलिसांशी संपर्क साधावा.

जर एखाद्या व्यक्तीस मारहाण झाली तर आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा प्रकारचे प्रसारित होणारे संदेश आपण फॉरवर्ड करू नयेत अगर व्हायरल करू नये, असे संदेश जाणीवपूर्वक व्हायरल केल्यास आपणाविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

वरील कारणामुळे कोणीही घाबरून न जाता जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा नियंत्रण
कक्षात संपर्क करावा. पोलीस नियंत्रण कक्ष अहमदनगर दूरध्वनी क्रमांक 0241-2416132 / डायल 112 हेल्पलाईनवर संपर्क करावा,
असे आवाहन अहमदनगर पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here