जामखेड न्युज——
बीड काॅर्नर ते पोलीस स्टेशन पर्यतचा रस्ता पूर्णत्वाकडे!!
आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नामुळे जामखेडच्या वैभवात भर
शाळा काॅलेज व प्रशासकीय कार्यालये असणारा
एकेकाळी अरूंद, अतिक्रमणाने वेढलेला, घाणीचे साम्राज्य असलेला दुर्गंधीच्या विळख्यात सापडलेल्या या रस्त्यावरून चालताना नाकाला रूमाल बांधून चालावे लागत होते. आमदार रोहित पवार रोहित पवारांच्या प्रयत्नातून शहराच्या वैभवात भर टाकणारा दुभाजकासह लाईट व गार्डन असलेला रस्ता लवकरात लवकर पूर्णत्वाकडे जात आहे.

जामखेड शहरातील बीड रोड काॅर्नर ते पोलीस स्टेशन पर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला होता आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे या कामासाठी दोन कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली अकरा मिटरचा क्राॅंक्रीट रस्ता एक मिटर मध्ये रस्ता दुभाजकाध्ये लाईट व गार्डन होणार आहे.

या रस्त्यावर तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, दुय्यम निबंधक, यासह अन्य प्रशासकीय कार्यालय शाळा काॅलेज आहेत आज हे काम पुर्णत्वास येताना दिसत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

एकेकाळी अतिक्रमणाने वेढलेला, घाणीचे साम्राज्य असलेला दुर्गंधीच्या विळख्यात सापडलेल्या या रस्त्यावरून चालताना नाकाला रूमाल बांधून चालावे लागत होते. आमदार रोहित पवार रोहित पवारांच्या प्रयत्नातून शहराच्या वैभवात भर टाकणारा दुभाजकासह लाईट व गार्डन असलेला रस्ता लवकरात लवकर पूर्णत्वाकडे जात आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.




