जामखेड न्युज——
साई श्रध्दा काॅस्मेटिक आणी इमिटेशन ज्वेलरी नविन दुकानाचा आमदार रोहित पवारांच्या हस्ते मोठ्या उत्साहात शुभारंभ
सलुन, ब्युटी पार्लर व मेकअप साहित्य होलसेल दरात मिळणार
साई श्रध्दा काॅस्मेटिक आणी इमिटेशन ज्वेलरी नविन दुकानाचा आमदार रोहित पवारांच्या हस्ते मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला यावेळी प्रमुख उपस्थिती अक्षय कर्डिले, जयदत्त धस मनिष शिंदे इंटरनॅशनल हेअर आर्टिस्ट नगर हे होते. दुकानात सलुन साहित्य, ब्युटी पार्लर, लेडीज ज्वेलरी व मेकअप साहित्य होलसेल दरात मिळेल अशी माहिती विकास सांगळे, मनोज पवार, सचिन सांगळे यांनी दिली.
जामखेड:दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी जामखेड कॉम्प्लेक्स जामखेड या ठिकाणी श्री साई श्रद्धा कॉस्मेटिक या नवीन दुकानाचे उद्घाटन जामखेड कर्जत विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार रोहित दादा पवार साहेब यांच्या हस्ते व अक्षय भैय्या शिवाजीराव कर्डिले आणि जयदत्त भैय्या सुरेश धस, मनीष शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले या प्रसंगी जामखेड पंचायत समिती मा. सभापती भगवान दादा मुरूमकर सरपंच शिवाजी काका डोंगरे ,भीमराव बापू कापसे,,सर्व मोहा ग्रा. सदस्य.उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना आ. रोहित दादा पवार,अक्षय भैय्या कर्डिले आणि जयदत्त भैय्या यांनी या नवीन व्यवसायासाठी विकास सांगळे, मनोज पवार ,सचिन सांगळे यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने सर्व मित्र परिवार,आप्तेष्ट ,नातेवाईक उपस्थित होते त्याबद्दल ग्राम पंचायत सदस्य विकास सांगळे यांनी सर्वांचे आभार मानले.
आता जामखेड करांसाठी सलुन साहित्य, ब्युटी पार्लर, लेडीज ज्वेलरी व मेकअप साहित्य होलसेल दरात मिळेल अशी माहिती विकास सांगळे, मनोज पवार, सचिन सांगळे यांनी दिली आहे.