शासकीय ग्रेड परीक्षेसाठी केंद्र ल.ना.होशिंग विद्यालय तयार

0
268

 

 जामखेड न्युज——

शासकीय ग्रेड परीक्षेसाठी केंद्र ल.ना.होशिंग विद्यालय तयार

दरवर्षीप्रमाणे 2022 याही वर्षी शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा इलेमेंटरी आणि इंटरमिजिएट होत असून त्या परीक्षेसाठी सेंटरची रचना आदरणीय श्री प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली आहे.

शालेय जीवनातील एलिमेंट्री व इंटरमिजिएट महत्त्वाच्या परीक्षा असून त्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना रंग व रंग संवाद, आकार व रचना,नक्षीकाम याची माहिती होऊन कामांमध्ये टापटीपपणा व स्वच्छता येते व त्याचबरोबर अक्षर सुधारण्यास मदत होऊन मनाची एकाग्रता निश्चित वाढते.
या विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक बाबींमध्ये सुधारणा होऊन त्याचबरोबर दोन्ही परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना आज डिजिटल युगात अनेक क्षेत्रांमध्ये या परीक्षेचा उपयोग होतो व ही परीक्षा पास असेल तरच कलेच्या कोणत्याही क्षेत्रातील शाखेला प्रवेश मिळतो.

इलेमेंटरी परीक्षा 28 व 29 सप्टेंबर 2022 ला दोन दिवस होत आहे.त्याचप्रमाणे इंटरमिजिएट परीक्षा 30 सप्टेंबर 2022 व 1 ऑक्टोबर 2022 या दोन दिवशी होणार आहे. या परीक्षेमध्ये वस्तू चित्र व स्थिरचित्र,रचना चित्र,संकल्प चित्र,अक्षर लेखन व भूमिती असे विषय आहेत.
त्यामुळे या परीक्षेला निश्चितच महत्त्व वाढले आहे.
जागृत पालकांमुळे या परीक्षेला विद्यार्थ्यांचे बसण्याचे प्रमाणही वाढलेले आहे.

संपूर्ण जामखेड तालुक्यातून विद्यार्थ्यांचाही मोठा प्रतिसाद आहे. यावर्षी पहिली परीक्षा एलिमेंटरी परीक्षेसाठी 674 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून पहिल्या परीक्षेचे 26 ब्लॉक आहेत व दुसरी परीक्षा इंटरमिजिएट साठी 275 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. दुसऱ्या परीक्षेचे एकूण अकरा ब्लॉक आहेत. एकूण 949 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.

जामखेड केंद्रासोबत नान्नज या ठिकाणीही केंद्र आहे.
केंद्र क्रमांक 108006 ल.ना. होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड विद्यालयातील परीक्षेची रचना प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक श्री रमेश अडसूळ.पर्यवेक्षक श्री बाळासाहेब पारखे,श्री रामचंद्र होशिंग भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक श्री राऊत मुकुंद व श्रीमती संगीता दराडे,श्री सचिन शेटे भाऊसाहेब,कॉम्प्युटर शिक्षक श्री निलेश भोसले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी परीक्षेचे काम पाहतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here