जामखेड न्युज——
मल्टिस्टेट व राज्य सहकारी पतसंस्था यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा सहकार भारतीचे सहकार मंत्री अतुल सावे यांना निवेदन
मल्टिस्टेट पतसंस्था व राज्य सहकारी पतसंस्था यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा असे निवेदन सहकार मंत्री अतुल सावे यांना सहकार भारतीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अभिमान शिंदे व संघटन प्रमुख ज्ञानेश्वर अंदुरे यांनी दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की इतर सहकारी बँक व राज्य सहकारी पतसंस्था यांच्या तुलनेने मल्टिस्टेट पतसंस्थाना शाखा विस्तार करण्यास परवानगी देण्यात यावी क्रेडिट ब्युरो ची सभासद मिळण्याबाबत विचार करावा कजँ वसुली साठी सरफेशी कायदा लागू करण्यात यावा सहकारी पतसंस्था एन पी सी आय सभासद देण्यात यावे टी डी एस कपाती मध्ये सुट मिळावी सभासदांच्या खात्यावरील रोख व्यवहाराच्या मर्यादा वाढविण्यात याव्यात.
अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे
निवेदन देतांना सहकार भारतीचे संचालक अंबादास पांडे, आशाताई मिस्किन, अरविंद कासार, डॉ विक्रम भोसले, अल्ताफ शेख, बळीराम मेहर, दिपक देवमाने सह ज्ञानेश्वर अंदुरे उपस्थित होते.