जामखेड न्युज——राजेंद्र नन्नवरे यांना ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स अवार्ड्स 2022 चा पुरस्कारजामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड देत समृद्धीचे मार्ग तयार करणाऱ्या तसेच दर्जेदार रोपवाटिका, नर्सरी उभारून फलोत्पादनात राज्याला अग्रेसर ठेवणाऱ्या जिद्दी नर्सरी चालकांना ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स अवार्ड्स दिला जातो आणि तो जामखेड तालुक्यातील आरणगावचे राजेंद्र नन्नवरे यांना मिळाल्याने जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स अवार्ड्स 2022 हा नर्सरी क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा पुरस्कार आरणगाव येथील राजेंद्र नर्सरीचे संचालक राजेंद्र आजीनाथ नन्नवरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार, आमदार प्रा. राम शिंदे, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे राजेंद्र पवार, दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, आरणगावचे सरपंच अकुंश शिंदे सह समस्त आरणगावचे ग्रामस्थ व परिसरातील नातेवाईक व मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले आहे.

पुणे येथे दि १३ सप्टेंबर रोजी राज्याचे साखर आयुक्त डॉ. शेखर गायकवाड, फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, अॅग्रोवन चे संपादक आदिनाथ चव्हाण यांच्या शुभहस्ते राजेंद्र नन्नवरे यांना ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स अवार्ड्स 2022 हा पुरस्कार देण्यात आला.

दर्जेदार रोपवाटिका, नर्सरी उभारून फलोत्पादनात राज्याला अग्रेसर ठेवणाऱ्या जिद्दी नर्सरी चालकांना ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स अवार्ड्स दिला जातो आणि तो राजेंद्र नन्नवरे यांना मिळाला आहे त्यामुळे जामखेड तालुक्यातील आरणगावचे नाव राज्य पातळीवर गाजले आहे.
राज्याच्या कृषी व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी परिश्रमातून समृद्ध करीत उत्तुंग भरारी घेणाऱ्या युवा उद्योजकांना हा पुरस्कार दिला जातो. राजेंद्र नन्नवरे हे 1985 पासून नर्सरी क्षेत्रात काम करत आहेत. नर्सरी क्षेत्रात अनेक नवनवीन प्रयोग केले आहेत. यामुळे त्यांच्या कामाची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली आहे.