जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील सावरगाव येथील अमर मारूती ढवळे वय ३५ हे जामखेड वरून आपल्या गावी सावरगाव कडे मोटारसायकल वर चाललेले असताना साकत कडून भरघाव वेगाने येणाऱ्या 8055 स्कॉर्पिओ गाडीने पोद्दार शाळेजवळ धडक झाली या धडकेत अमर ढवळे जागीच मृत झाले. यामुळे सावरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सायंकाळी सात वाजण्याच्या आसपास अपघात झाला मोटारसायकल व अमर ढवळे जागीच पडलेले होते स्काॅर्पिओ निघून गेली गाडीच्या नंबर चा एक शेवटचा नंबर तिथे पडलेला होता. तसेच काही लोकांनी भरधव
वेगाने जाणारी गाडी पाहिली होती तेव्हा सावरगाव येथील मुलांनी शोध घेतला असता जामखेड येथे गाडी लावून चालक फरार झाला होता.

जामखेड पोलीसांत राजेंद्र अप्पा ढवळे, ४४ हनुमान वस्ती सावरगाव यांनी खबर दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

अमर ढवळे यास ग्रामीण रुग्णालय दाखल केले असतात डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. डॉ शंशाक वाघमारे यांनी शवविच्छेदन केले रात्री अकरा वाजता शोकाकुल वातावरणात सावरगाव हनुमान वस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत अमर ढवळे याच्या मागे आई- वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.
ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर सावरगाव येथील तरूण जमा झाले होते. पोलीसांनी अकस्मात मृत्यू ची नोंद केली आहे.