जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज
माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ भाजप नेते दिलीप गांधी (वय६९) यांचे आज पहाटे करोनामुळे निधन झाले आहे त्याच्यावर
दिल्लीत सुरू होते उपचार होते.
गांधी यांच्या वर दिल्लीत खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दिलीप गांधी यांनी तीन वेळा नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते. त्रास होऊ लागल्याने त्यांनी चाचणी करून घेतली असता कोरोना पॉझिटिव्ह होते. आज पहाटे त्यांचे निधन झाले त्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.