जामखेड प्रतिनिधी
ग्रामीण भागातील महिलांनी फक्त चूल व मूल यात गुंतून न राहता बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकता यातुन महिलांचे सक्षमीकरण व स्वावलंबन होणार आहे असे मत पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियाना अंतर्गत
तालुक्यातील साकत येथे भव्य असा महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर, माजी सरपंच हरीभाऊ मुरुमकर, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वळेकर, उर्मिला मुरुमकर, स्वप्नाली तोडकर, मिराबाई वराट, सतिश लहाने, मंगल अडसुळ, रुक्मिणी लोहार, साखरबाई लहाने, पुजा लोहार, हर्षदा लोहार, कौशल्या लोहार, सरस्वती बोराटे, ज्ञानेश्वर लहाने, आशा साळुंखे, कविता लहाने, मनिषा वराट यांच्या सह अनेक महिला मान्यवर उपस्थित होत्या.
यावेळी टिम नंबर सहा साकत च्या सुषमा जरतात, सविता ताकसांडे, शुभांगी पिसे, शारदा खडसे, अशा साळुंखे हजर होत्या.

यावेळी बोलताना डॉ. मुरूमकर म्हणाले की, शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील वाडी वस्तीवरील महिलांपर्यत पोहचवून महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी जिवनोन्नती अभियानांतर्गत महिलांचे सक्षमीकरण होणार आहे.
यावेळी सुमारे दोनशे पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या.
साकत गावात वीस गट व कोल्हेवाडी व पिंपळवाडी येथे दहा गट असे तीस गट दोन दिवसात तयार होतील असा विश्वास मुरुमकर यांनी व्यक्त केला.
चौकट
” गरीबांसाठी मजबूत अशा संस्थांची बांधणी करुन त्याद्वारे लाभादायक स्वयंरोजगार व कुशल वेतनी रोजगाराची संधी मिळविणे गरीब कुटुंबांना शक्य व्हावे व त्याद्वारे दारिद्रय कमी करणे, परिणामी कायमस्वरुपी तत्वावर त्यांच्या उपजिविकेत उल्लेखनीय सुधारणा करणे हे काम या बचत गटाच्या माध्यमातून होणार आहे “