जामखेड न्युज——
जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद यांच्या रूद्रा पेंट्स चे नवीन जागेत स्थलांतर व रूद्रा प्लाय अॅड हार्डवेअर या नवीन दुकानाचा शुभारंभ गुरूवार दि. ८ सप्टेंबर रोजी भव्य उद्घाटन शुभारंभ माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार व माजी मंत्री आमदार सुरेश धस हे उद्घाटन कार्यक्रमासाठी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद यांच्या रूद्रा प्लाय अॅड हार्डवेअरचा भव्य उद्घाटन शुभारंभ गुरूवार दि. ८सप्टेंबर रोजी दुपारी १.१५ वाजता लक्ष्मी चौक खर्डा रोडवर संपन्न होत आहे.
हभप कैलास महाराज भोरे यांच्या शुभहस्ते तर माजी मंत्री व विद्यमान विधानपरिषद सदस्य प्रा . राम शिंदे, कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार, तसेच माजी मंत्री व विधानपरिषद सदस्य आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी असतील.
तिन्ही दिग्गज आमदार एकाच व्यासपीठावर येत असल्याने नेमकी काय राजकीय जुगलबंदी रंगणार याविषयी लोकांमध्ये उत्सुकता आहे.
रूद्रा प्लाय अॅड हार्डवेअर उद्घाटन प्रसंगी तिन्ही आमदार उपस्थित राहणार आहेत हभप कैलास महाराज भोरे यांच्या शुभहस्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी असतील अशी माहिती जामखेड न्युजशी बोलताना निमंत्रक युवराज भाऊ काशिद अध्यक्ष मराठी भाषिक संघ इंदोर तसेच संजय (काका ) काशिद शिवसेना तालुकाप्रमुख जामखेड यांनी दिली आहे.