जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील खर्डा याठिकाणी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते तसेच पुणे जिल्हा बास्केटबॉल संघाचे सचिव व धनेगाव सेवा सोसायटीचे संचालक प्रा. सचिन गायवळ यांच्या हस्ते राजमुद्रा ग्रुपसह विविध ठिकाणी गणरायाची आरती करण्यात आली.
त्या प्रसंगी खर्डा ग्रामपंचायत सदस्य व भारतीय जनता पार्टी तालुकाउपाध्यक्ष वैजिनाथ पाटील. प्रा. सचिन गायवळ यांचे चाहते, विविध गणेश मंडळांचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांचे परिसरात मोठ्या प्रमाणावर समाजकार्य आहे. त्यामुळे सर्व सामान्य माणसाला गायवळ सर आपल्या हक्काचा माणुस वाटतो. परिसरातील जनतेच्या सुख दुखात ते सामील असतात लोकांच्या अडीअडचणी ते सोडवतात यामुळे विविध कार्यक्रम साठी गायवळ सरांना युवक हक्काचे बोलवितात.
प्रा. सचिन गायवळ हे आगामी निवडणुकीत खर्डा
जिल्हा परिषद गटाचे संभाव उमेदवार असल्याने
त्यांच्या जनसंपर्कामुळे संभाव्य विरोधक आताच
खचून जात असल्याचे चित्र आहे. विविध
कार्यक्रमांमधील त्यांचा वाढता चाहता वर्ग पाहता
गायवळ सरांची वाढती लोकप्रियता दिसून येते.