सहकारमहर्षी जगन्नाथ राळेभात यांचे अल्पशा आजाराने निधन, तालुक्यात पसरली शोककळा

0
288

 

जामखेड प्रतिनिधी
             जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यात सहकार महर्षी म्हणून ओळख असणारे तालुक्यातील सहकार क्षेत्रातील धुरंधर व मुत्सद्दी राजकारणी तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे सहकार महर्षी जिल्हा बँकेचे माजी संचालक जगन्नाथ ( तात्या ) राळेभात पाटील यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या निधनाने जामखेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

दिवंगत जगन्नाथ (तात्या) राळेभात हे काही दिवसांपासुन आजारी होते. पुणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांचेवर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

ते जिल्हा बँकेचे गेल्या पंधरा वर्षे संचालक होते . जामखेड तालुक्यातील सोसायटीच्यांवर त्यांचे मोठे वर्चस्व होते . जगन्नाथ तात्यांना मिस्तरी या नावाने देखील ओळखले जात होते.

जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांचे ते वडील होते . तालुका विकास अधिकारी सरोदे साहेब यांचे ते सासरे होते .

गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी बँक कर्जाच्या माध्यमातून मदत करुन कन्यादान करणारं सहकार महर्षी नेतृत्व हारपल्याने तालुक्यातील शेतकरी पोरका झाला आहे . सहकार क्षेत्रातील ही पोकळी कधी भरुन न निघणारी आहे . सहकार महर्षी जगन्नाथ ( तात्या ) राळेभात यांचे निधनाने संपूर्ण जामखेड तालुक्यात शोककळा पसरली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here