संभाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लेखन करणाऱ्या हरामखोरांचा बुरखा फाडणे काळाची गरज- इतिहासाचार्य अनंत दारवटकर

0
207
जामखेड न्युज——
संभाजीराजांचा इतिहास लिहीताना ज्यांनी ज्यांनी  हरामखोरी केली, त्यांची नावे मी माझ्या पुस्तकात जाहीरपणे लिहीली. त्यांनी लिहलेल्या खोट्या इतिहासाचा बुरखा फाडला. संभाजी महाराजांविषयी करण्यात आलेले अनेक दावे पुराव्यानिशी खोडून काढले. आपल्या पूर्वजांनी जो इतिहास घडवला आहे त्याचा अभिमान प्रत्येक बहुजनाला असला पाहिजे, परंतू खरा इतिहास समजणे आवश्यक आहे. यासाठी इतिहास संशोधनाची आवश्यकता आहे. तरुणांनी इतिहासातून ऊर्जा घेऊन नवा इतिहास निर्माण करणे आवश्यक आहे असे सांगत इतिहास लेखनात हरामखोरी करणारांचे बुरखे फाडणे ही काळाची गरज असल्याचे रोखठोक मत इतिहासाचार्य अनंत दारवटकर यांनी मांडले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता सईबाईसाहेब भोसले यांच्या स्मृती दिनानिमित्त जामखेड तालुक्यातील जवळा येथे शिवस्फुर्ती समुह आणि छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती यांच्या वतीने इतिहास अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज हा या शिबिराचा विषय होता. या शिबिरातून इतिहासाचार्य अनंत दारवटकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयीचा खरा इतिहास उलगडून दाखवला.
संपुर्ण सत्रात छत्रपती संभाजी महाराजांचा जिवंत इतिहास दारवटकर यांनी साक्षात उभा केला. अंगावर रोमांच आणणारे पराक्रमी प्रसंग त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितलेला इतिहासातून नवा दृष्टिकोन उपस्थितांना मिळाला. गडकिल्ले अभ्यासक संदिप कदम सर यांनीही प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शिवस्फुर्ती समुहाचे कार्याध्यक्ष अशोक पठाडे यांनी प्रास्ताविक करत इतिहास अभ्यास शिबिराचे महत्व विशद केले. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते मधुकर (आबा) राळेभात हे होते. यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले, ज्योती क्रांती मल्टीस्टेटचे चेअरमन अजिनाथ हजारे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, जामखेड तालुका मिडीया क्लबचे सचिव सत्तार शेख, माजी उपसभापती दिपक पाटील, प्राचार्य विकी घायतडक, युवा उद्योजक अप्पासाहेब हारगुडे, मावळा युवा संघाच्या संस्थापक अध्यक्षा रुपालीताई पाटील, छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष शंकर (आप्पा) जाधव, व्याख्याते गणेश भोसले, युवा नेते युवराज देवकर, संभाजी ब्रिगेडचे नितिन खटके, अमित जाधव, आशिष पाटील, माजी सरपंच प्रदिप दळवी, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद आव्हाड, संजय गुटाळ, माजी सरपंच भारत काकडे, सरपंच दिलीप काकडे, चेअरमन जालिंदर चव्हाण, सरपंच प्रविण पोते, सरपंच सुशेन ढवळे, माजी सरपंच कांतीलाल वाळुंजकर, महेश टेकाळे, भाऊ मुरूमकर, ज्ञानदेव ढवळे, नंदकिशोर खरात,संदिप सोनवणे, हनुमंत उदमले, सोनू बळे, संतोष मोरे हे उपस्थित होेते.
इतिहास अभ्यास शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवस्फूर्ती समूहाचे विवेक मोरे, राहूल साबळे, स्वानंद घरत, अनंत शेवाळे, रामेश्वर नाईकवाडे, अक्षय तळेकर, महेश दैन, महादेव वराट सर, जीवन होगले, तानाजी भांडवलकर, बाबुराव टेकाळे तसेच छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे प्रेमराज मोहिते, आकाश शिंदे, राहूल मुरूमकर, विकास वाळुंजकर, ऋषिकेश आव्हाड, पप्पू मते, संदिप काढणे, तुषार काढणे, विनोद वाळुंजकर, अक्षय शिंगटे, संस्कार लेकुरवाळे, ओंकार मासाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
तर छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या ज्युनिअर कॉलेजचे भंडारे सर, मिसाळ सर, अवसरे सर, नलवडे सर, सरोदे सर व वाळुंजकर तात्या यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिरासाठी अहमदनगर, धाराशिव, बीड, सोलापूर व पुणे येथील मावळ्यांनी उपस्थिती लावली.या शिबिरासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश ठोसर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here