जामखेड न्युज——
तालुक्यातील पाटोदा गरड येथील सामाजिक कार्यकर्ते गफारभाई पठाण हे जरी मुस्लिम समाजाचे असले तरी शालेय जीवनापासूनच सर्व धर्म समभावाची शिकवण जीवनात आचरणात आणत आहेत. आषाढी कार्तिकी साठी गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूरला पायी दिंडीचे आयोजन करतात स्वत: दिंडीत सामील होतात. एकादशी चा उपवास करतात तसेच गणेशोत्सवही मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात. गफारभाई हेच खरे हिंदू मुस्लिम एकतेसाठी झटणारे अवलीया आहेत असेच म्हणावे लागेल.

पाटोदा गरड येथील माजी सरपंच गफारभाई पठाण हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. हिंदूच्या सर्व उत्सवात हिरिरीने सहभागी होतात. पंढरपूर दिंडी, गावात सामाजिक सलोखा राखण्यासाठी नेहमीच पुढाकार असतो. एक गाव एक गणपती साठी नेहमीच अग्रेसर असतात.

सध्या गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहे दररोज कोठे ना कोठे गफारभाई पठाण यांच्या हस्ते गणपतीची आरती असते. हिच खरी सर्व धर्म समभावाची शिकवण आहे. सर्व धर्माची सारखीच शिकवण आहे आणी ती म्हणजे मानवता असे गफारभाई म्हणतात.


जामखेड शहरातील नगर रोड येथील मोरया ग्राफीक्स युवा मंच तसेच पिंपरखेड येथील धर्मयोद्धा युवा मंच च्या वतीने गणपतीची आरतीसाठी आज रोजी पाटोदा गरडाचे कर्तव्यदक्ष माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांना निमंत्रित करण्यात आले होते.
गफ्फारभाई पठाण एक मुस्लिम समाजाचे असून,पाटोदा गरडाचे माजी सरपंच गफ्फारभाई पठाण आज रोजी गणरायाची आरती त्याच्या हस्ते पार पडली. जामखेड तालुक्यामध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन आहे.
याबाबत आपली भावना व्यक्त करताना गफ्फारभाई पठाण जामखेड न्युजशी बोलताना म्हणाले की, माझ्यासाठी लहानपणापासून गणेशोत्सव हा आनंदाचा क्षण राहिला आहे. धर्माने मुस्लिम असलो, तरी शालेय जीवनात शिकत असताना सर्वधर्म समभावाची शिकवण दिली.
आज गणेशोत्सवाच्या दिवशी बाप्पाची आरती करण्याचा मान मिळत आहे हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. यावेळी मोरया ग्राफिक्स युवा मंच जामखेड अध्यक्ष मंगेश काकडे, उपाध्यक्ष कृष्ण चव्हाण, धर्मयोद्धा युवा मंच पिंपरखेड.अध्यक्ष आबासाहेब ढवळे, उपाध्यक्ष -अरुण ढवळे, सचिव देविदास लाढाणे, सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो.
मोठ्या भक्ती भावाने गणरायाची आरती करण्यात आली.जात,धर्म,पंत या पलीकडे जावून माणूस म्हणून तसेच हिंदू – मुस्लिम ऐैक्याचे दर्शन घडत आहे.