Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये काँग्रेसला खिंडार, बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक जमीर सय्यद यांचा काँग्रेसच्या...

जामखेडमध्ये काँग्रेसला खिंडार, बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक जमीर सय्यद यांचा काँग्रेसच्या सर्व पदाचा राजीनामा

0
278

जामखेड न्युज——

    गेल्या बावीस वर्षापासून काँग्रेस पक्षात इमानेइतबारे काम केले, कधी पदाची अपेक्षा ठेवली नाही. सध्या जिल्हा काँग्रेस कमिटीत काही कान फुकणारे नेते आहेत. यामुळे काम करणाऱ्या माणसाला किंमत नाही. काँग्रेस खिळखिळी करण्याचे काम हि मंडळी करत आहे. तालुक्यात दलबदलू व चंपोगिरी करणाऱ्यांना पदे दिले आहेत. मला विश्वासात न घेता पदे दिली जातात. माझी काँग्रेस पक्षात घुसमट होत होती म्हणून मी आज सर्व पदाचा राजीनामा देत आहेत. जमीर सय्यद यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला खिंडार पडले आहे. 
    जमीर सय्यद हे २०००पासून काँग्रेस पक्षात सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत होते. त्यांनी आतापर्यंत
युवक काँग्रेस शहराध्यक्ष सहा वर्षे, सेवा दल काँग्रेस अडिच वर्षे तालुकाध्यक्ष, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष तीन वर्षे, आय काँग्रेसचे शहराध्यक्ष, कर्जत जामखेड सोशल मीडिया प्रमुख प्रदेश सदस्य म्हणून काम केले आहे. 
   
काँग्रेस पक्षात सध्या पक्षात सक्रीय कसलीही किंमत नाही 
जिल्हा काँग्रेस कमिटीत काही कान फुकणारे नेते यामुळे काम करणाऱ्या माणसाला किंमत नाही. काँग्रेस खिळखिळी झाली आहे. अनेक लोक कान फुकण्याचे काम करतात. यामुळे पक्ष रसातळाला गेला आहे. माझे शहराध्यक्ष पदावरून चौकशी करून पद काढायला हवे होते. पण तसे काही केले नाही. श्रेष्ठी लक्ष देत नाही
   यावेळी जामखेड न्युजशी बोलताना सय्यद यांनी सांगितले की, काँग्रेस शहराध्यक्ष पदावरून अचानक काढले. २२ वर्षाच्या निष्ठेला तिलांजली दिली. विचारले नाही काल पक्षात आलेल्या व चंपोकोगिरी करणार्याचे ऐकून पदावरून दूर केले. शहरात सात हजार मुस्लिम मतदार आहेत.  यांचा फक्त ओट बॅक म्हणून माझा वापर करून घेतला.  माझी पक्षात मोठी घुसमट होत होती. यामुळे राजीनामा देत आहे असे जाहीर केले. 
मित्र मंडळी कार्यकर्ते यांच्याशी विचारविनिमय करून लवकरात लवकर पुढील निर्णय घेणार असल्याचे जमीर सय्यद यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!