जामखेड न्युज——
गडचिरोलीच्या कमलापूर हत्ती कॅम्पमधला हत्ती (Kamlapur Elephant Camp) काल मध्यरात्री गुजरातला नेण्यात आला आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आक्रमक झाले आहेत. राज्यात गणेशोत्सव सुरू असतानाच हत्ती गुपचूपपणे गुजरातला नेणं हा महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. हत्तीला रस्त्यावरून नेत असतानाचा एक व्हिडिओ रोहित पवारांनी ट्वीट केला आहे.
‘गजमुख असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाचा उत्सव आपण सर्वजण साजरा करत असताना महाराष्ट्रातील एकमेव गडचिरोलीतील कमलापूरच्या हत्ती कॅम्पमधील हत्ती मध्यरात्री गुपचूपपणे गुजरातला हलवणं हा राज्याच्या अस्मितेवर घाला आहे. हा विषय मी यापूर्वीही विधानसभेत मांडला आहे,’ असं रोहित पवार त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
‘हा विषय लहान वाटंत असला तरी राज्याच्या अस्मितेचा आहे आणि राज्याची अस्मिता ही महान आहे. त्यामुळं पालकमंत्री असताना हत्तीचं संरक्षण करण्याचं दिलेलं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाळावं, अशी माझी त्यांना विनंती आहे आणि ते पाळतील, असा विश्वास आहे!, असंही रोहित पवार दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले.