जामखेड न्युज——
भाजीपाला विक्रीसाठी दुचाकीवरून जाणाऱ्या बापलेकाचा भरधाव कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात बारामती – पैठण रोडवरील चोभानिमगांव येथे शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास झाला. अरूण सोन्याआबा औटे आणि सुरज अरूण औटे अशी मृतांची नावे आहेत.

आष्टी तालुक्यातील नांदा येथील औटे पितापुत्र शेती करतात . आज सकाळीच दोघेही शेतातील भाजीपाला विक्रीसाठी कड्याकडे दुचाकीवरून घेऊन जात होते.


दरम्यान, कड्यावरून मिरजगावकडे जाणाऱ्या एका भरधाव कारची आणि दुचाकीची चोभानिमगांव जवळ समोरासमोर धडक झाली . यात दुचाकीवरील बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला.

माहिती मिळताच कडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . घरातील दोन कर्ते पुरुष मृत झाल्याने औटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





