शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा श्री नागेश विद्यालय उत्साहात संपन्न. 

0
290
जामखेड न्युज——
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय मध्ये एन एम एम एस शिष्यवृत्ती धारक व नूतन पीएसआय मनीषा वाघमारे यांचा भव्य सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक स्कूल कमिटीचे व रा काँ प्रदेश सरचिटणीस राजेंद्रजी कोठारी होते. 
  प्रमुख उपस्थिती जामखेड नगर परिषद मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, कर्तव्यदक्ष पी एस आय राजू थोरात, स्थानिक स्कूल कमिटीचे हरिभाऊ बेलेकर राष्ट्रवादी जामखेड तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अशोक यादव, प्राचार्य मडके बी के मुख्याध्यापिका चौधरी के डी, पर्यवेक्षक रघुनाथ मोहोळकर, प्रकाश सोनवणे, नगरसेवक अमित जाधव, विनायक राऊत प्रकाश काळे ,राजेंद्र गोरे, वैजनाथ पोले, ऋषिकेश कुंजेर शिवाजी ढाळे,माजी उपप्राचार्य  प्रकाश तांबे , गोपाळ बाबर ,संतोष पवार, सांगळे ए एम, आंधळे मॅडम, शेकडे मॅडम, शेटे ज्ञानेश्वर, एनसीसी प्रमुख मयूर भोसले,  विद्यार्थी माता पालक व सर्व शिक्षक उपस्थित होते. 
          विद्यालयाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते जामखेडचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, कर्तव्यदक्ष पीएसआय राजू थोरात व नूतन पीएसआय मनीषा वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला NMMS परीक्षा 2021.22 शिष्यवृत्ती धारक  विद्यार्थी -निकम अभिजित गणेश , भिलारे वेद प्रदीप,पिंपळे सिद्धेश कु़ृंडलीक, पोकळे शिवम राजेंद्र,
 राळेभात शिवम आनंद ,वारे संग्राम सतीश ,टेकाळे आदित्य हरिश्चंद्र, कोल्हे सार्थक रमेश, खाडे राहूल संपत ,जगताप कृष्णा काकासाहेब,पोकळे अथर्व राजेंद्र ,मोरे शिवशंभू शरद ,पवार ओंकार महिपती,उगलमुगले सार्थक निलेश,जाधव रोहन माधव व  मार्गदर्शक शिक्षक-  गर्जे एस. व्ही,बोलभट आर. एम. ,शिंदे बी. एस.,लटपटे डी. व्ही. ,ससाणे एस. आर,बाबर जी. ए. विद्यार्थी व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. 
    या वेळी उपप्राचार्य प्रकाश तांबे यांनी विद्यालयाकडे रोख रक्कम 51 हजार रुपये सुपूर्द केली. 
       प्रस्ताविकामध्ये प्राचार्य मडके बी के  यांनी
     या सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी पासून ते 12 वी पर्यंत दरवर्षी प्रत्येकी  12000/- रुपये ( 4 वर्षात 48000/- रुपये ) शिष्यवृत्ती मिळणार आहे.एकूण शिष्यवृत्ती रक्कम  रूपये – 7,20,000 मिळणार आहे . व पुढील वर्षी यापेक्षा दुप्पट विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला आणणार आहोत असे मनोगत व्यक्त केले. 
         मनोगतामध्ये पीएसआय मनीषा वाघमारे यांनी विद्यालयाने सत्कार केला त्याबद्दल आभार मानून विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.कर्तव्यदक्ष पीएसआय राजू थोरात यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे यश नक्कीच मिळते असे मनोगत व्यक्त केले.
  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक यादव यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही पालक तत्पर आहोत असे मनोगत व्यक्त केले .
    नगरपरिषदे मुख्याधिकारी म्हणून दंडवते यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर करून सांगितलेल्या सूचनांचे पालन करावे व पालकांनी आपल्या मुलांवर अनावश्यक इच्छा लागू नयेत. व सर्वांनी मिळून शाळेच्या  विकासामध्ये सहकार्य करावे असे मत व्यक्त केले.
       राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. व मी नागेश विद्यालय माजी विद्यार्थी आहे. शाळेची शिस्त चांगली आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःचे ,आई वडिलांचे, शाळेचे व तालुक्याचे नाव देशात उंचवावे  व्हावे असे मनोगत व्यक्त केले. 
  स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. 
      कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्रजी कोठारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धा परीक्षेसाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे व लागेल ती मदत आमच्या माध्यमातून आम्ही करू असे मनोगत व्यक्त केले.
    रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमदार रोहित दादा पवार , उत्तर विभागाचे  सल्लागार समितीचे  अध्यक्ष आमदार आशुतोष दादा काळे , 
  ,उत्तर विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर   , सहायक विभागीय अधिकारी काकसाहेब  वाळुंजकर, श्री  शिवाजीराव तापकीर , स्थानिक स्कूल कमिटी, स्थानिक सल्लागार समिती सर्व सदस्य ,शिक्षक -पालक संघ ,माता -पालक संघ , शालेय व्यवस्थापन व विकास समिती. यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी इंगळे व आभार प्रदर्शन शिंदे बी एस यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here