जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये जामखेड शहराचा पहिल्या पाचमध्ये नंबर आणण्यासाठी व आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या स्वप्नातील जामखेड बनवण्यासाठी स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड प्रा. मधुकर राळेभात व दिंगाबर चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने गेल्या बारा दिवसांपासून शहरातील जनतेला एकत्र करत दररोज सकाळी दोन तास श्रमदान करतात यामुळे परिसर चकाचक झाला आहे व स्वच्छता हि लोकचळवळ बनवली आहे.
सायंकाळी व्हाॅटस्अॅप वर उद्या सकाळी कोठे जमायचे कोणत्या भागातील स्वच्छता करावयाची हा मेसेज टाकला जातो व सकाळी आठ वाजता नागरिक ठरल्या ठिकाणी वेळेवर हजर राहतात व स्वच्छतेला सुरूवात होते. आज बारा दिवस झाले हा नित्य क्रम सुरू आहे.
या स्वच्छता अभियानात कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, नगरसेवक दिगांबर चव्हाण, पवन राळेभात, अमित जाधव, अजिंक्य ठोकळ, प्रितेश शिंदे, प्रविण उगले, अमोल गिरमे, आनंद जगताप वासिम सय्यद, शहाजी खवळे, अॅड हर्षल डोके, वैजीनाथ पोले, सुरेश पवार, काळदाते, ढगे, लखन राळेभात, हरिभाऊ आजबे, काकासाहेब माने, बापूसाहेब आडाले, ज्ञानचंद आडाले, तात्याराम कदम यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित असतात.

गेल्या बारा दिवसांपासून आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या स्वप्नातील जामखेड करण्यासाठी स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड साठी लोकांना एकत्र करून स्वच्छता अभियान राबवले जात आहे त्यामुळे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात व नगरसेवक दिंगाबर चव्हाण यांनी स्वच्छता अभियान हि लोकचळवळ बनवली आहे.