माजी मंत्री प्रा. राम शिंदे कोरोना पॉझिटिव्ह

0
177
जामखेड प्रतिनिधी 
जामखेड न्युज – – – 
माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी स्वतः  सोशल मीडियातून जाहीर केले असून ते लवकरात लवकर बरे होवोत अशी सदिच्छा कर्जत जामखेड मतदार संघातून अनेकानी व्यक्त केली आहे.
   नगर जिल्हयाचे माजी पालकमंत्री  प्रा. राम शिंदे यांनी आपल्या फेसबुक पेज वरून याबाबत माहिती दिली असून ते म्हणाले यामध्ये म्हणतात की
आज माझा covid 19 अहवाल सकारात्मक (corona + ve) आला असुन डॉक्टरांनी अलगीकरनात (Isolation) थांबण्याचा सल्ला दिला आहे, माझी तब्बेत चांगली आहे, मी परमेश्वराच्या कृपेने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच बरा होईल…- प्रा. राम शिंदे, माजी मंत्री.
प्रा राम शिंदे यांना कोरोना झाल्याच्या माहितीने अनेकांना धक्का बसला असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तीनी आपली कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here