जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण शास्त्र महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ आज दिनांक 11 मार्च 2021 रोजी करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रजापती ब्रह्मकुमारी मठाच्या शोभा दिदी या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष अर्चना सोमनाथ राळेभात, सारोळा ग्रामपंचायतीच्या सरपंच रितु अजय काशीद, प्रांजल अमित चिंतामणी या होत्या
प्रथम क्रमांक मोहिनी बबन राजगुरू 5555 रूपये, द्वितीय क्रमांक अंजली संदिप तुपेरे 3333 रुपये, तृतीय क्रमांक शिवानी शिवाजी आरेकर 2222 रुपये तर उत्तेजनार्थ नेहा सुमित जसाभाटी 1111रुपये यांनी क्रमांक पटकावले.
महिला दिनाचे औचित्य साधून कविता पोपट जगदाळे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते यासाठी भारतीय महिला सबलीकरण स्त्री – भ्रूण हत्या व महिला आत्याचार, स्वच्छ भारत अभियान व कोरोना योद्धा असे विषय ठेवण्यात आले होते. या स्पर्धेला शहरातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला होता.