जामखेड न्युज——
भाजपा नेते मोहित कंबोज यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत सूचक ट्वीट करत निशाणा साधला आहे.
कंबोज यांनी आधी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशीची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक नेता तुरुंगात जाणार असल्याचं विधान केलं होतं. त्यावर रोहित पवारांनी कंबोज यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
आता कंबोज यांनी थेट रोहित पवार यांनाच लक्ष्य केलं आहे.
मोहित कंबोज आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “मी सध्या बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीचा अभ्यास करत आहे. यात मी त्यांच्या कंपनीच्या यशाचाही अभ्यास करत आहे.
लवकरच मी या संदर्भात माहिती देईल. त्यामुळे तुम्हाला या कंपनीच्या यशामागील गोष्ट समजून घ्यायला मदत होईल.”