जामखेड न्युज——
भारतीय जनता पार्टीचे नेते मोहीत कंबोज यांनी अलीकडेच काही ट्वीट्स केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचं भाकीत त्यांनी आपल्या ट्वीटरद्वारे केलं होतं. त्यांचा बोलण्याचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होते.
मोहीत कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी केली जावी, अशी मागणी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना विधान आलं होतं. यावर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देत मोहीत कंबोज यांच्यावर टीका केली होती.
यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहीत पवार यांनीदेखील मोहीत कंबोज यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.
मोहीत कंबोज यांनी सामान्य नागरिकांचा पैसा असलेल्या दोन-तीन बँकांना चुना लावला आहे, त्यामुळे त्यांच्या ट्वीटला किती महत्त्व दिलं पाहिजे? हे आपण समजून घेतलं पाहिजे” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.