जामखेड शहरातील बैल बाजारात युवकाची फाशी घेऊन आत्महत्या

0
232
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज——
     जामखेड येथिल मार्केट यार्ड मधील बैल बाजारात एका युवकाने फाशी घेतली आहे त्याबाबत माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची नेहमीप्रमाणे मदत मदत करत स्वतःची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली घटनेची पाहणी व सर्व पोलीस प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयत आणला. 
   सविस्तर असे की, आज मंगळवार दि. १६ आॅगस्ट रोजी सकाळी ८:००  वाजता संजय कोठारी यांना एक फोन आला की, जामखेड मार्केट यार्ड मधील बैल बाजारात एका युवकाने फाशी घेतली आहे. 
सदर घटनेची माहिती समजतात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी स्वतःची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली. घटनेची पाहणी करून जामखेड पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना फोन द्वारे माहिती दिली असता त्यांनी ताबडतोब पोलीस कॉन्स्टेबल अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन देवडे यांना पाठवले. 
त्यांनी पंचनामा करून सदर मृतदेह कोठारी यांच्या रूग्णवाहिकेत टाकला. व ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम साठी आणून पोहोच केला आहे. यावेळी नजीर शेख , राहुल अहिरे यांनी त्यांना मदत केली. 
   भरत गुणाजी मोरे राहणार मिलिंदनगर, जामखेड असे सदर मयत व्यक्तीचे नाव असून घटनेची खबर बहीण यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन दिली आहे. 
पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील बडे करत आहेत. सदर मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here