जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——

साकत ग्रामपंचायतने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत घरोघरी तिरंगा ध्वजाचे वाटप करून ध्वजाविषयी माहिती सांगितली आज सकाळी ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण देशसेवक भरत वराट फौजी यांच्या हस्ते करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/ क्रांतिकारक/ स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या देदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानुसार आज सगळीकडे ध्वजारोहण करण्यात करण्यात आले साकत ग्रामपंचायत मध्ये देशसेवक मेजर भरत सखाराम वराट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

साकत ग्रामपंचायतने देशसेवक फौजी भरत वराट च्या हस्ते ध्वजारोहण करत एक आदर्श ठेवला आहे. सकाळी साडेसात वाजता श्री साकेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. गावातून प्रभातफेरी ग्रामपंचायत समोर आली सव्वा आठ वाजता मेजर भरत वराट फौजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी सरपंच मनिषा पाटील, हनुमंत पाटील, उपसरपंच राजू वराट, सदस्य महादेव वराट, विठ्ठल वराट, रामहरी वराट, राधे मुरूमकर, दिनकर मुरूमकर, गणेश वराट, दादासाहेब वराट, अमोल वराट, अभिषेक मुरूमकर अंगणवाडी सेविका मिराबाई वराट, मनिषा वराट, मनिषा सानप, छाया वराट, ज्योती लहाने, नानासाहेब लहाने,
सतिश लहाने, साकेश्वर विद्यालयातील मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अर्जुन रासकर, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, आण्णा विटकर, अतुल दळवी यांच्या सह सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी हजर होते.

घरोघरी तिरंगा ध्वज वाटप, ध्वजाविषयी माहिती तसेच देशसेवक भरत वराट फौजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी जामखेड न्युजशी बोलताना सरपंच हनुमंत पाटील यांनी सांगितले की, हर घर तिरंगा हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. देशाला स्वातंत्र्य करण्यात अनेकांनी आपल्या प्रणाची आहुती दिलेली आहे. सध्याही आपल्या सैनिकांमुळेच आपण निर्धास्त राहु शकतो. सैनिकांचा आपण मानसन्मान राखला पाहिजे म्हणून साकत ग्रामपंचायतने सैनिक भरत वराट यांच्या हस्ते ध्वजारोहण ठेवले आहे उद्या १४ रोजीही एका सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण ठेवण्यात आले आहे.