हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत आमदार राम शिंदे यांची बाईक रॅली माजी सैनिकांचा सन्मान

0
203
जामखेड न्युज——
     स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात यानुसार आज आमदार प्रा. राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांसोबत भव्य दिव्य बाईक रॅली काढली होती या रॅलीला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. 
    आमदार राम शिंदे यांनी पांढराशुभ्र गणवेश परिधान करत डोक्यावर पांढरी गांधी टोपी परिधान करत बुलेट वर स्वार होत भारत माता की जय या घोषणा देत संपूर्ण जामखेड शहराचे लक्ष वेधून घेत रॅली नागेश्वर चौकातून विठाई लाँन्स येथे माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला
भारतीय जनता पार्टी जामखेड च्या वतीने १३ आँगस्ट रोजी तिरंगा बाईक रँली मध्ये कार्यकर्त्यांनी टोपी, पांढरा शर्ट, गाड्यांना झेंडे लावून शहरात सर्वात मोठी रॅली काढण्यात आली होती.
श्री नागेश्वर चौक,खर्डा रोड, संविधान चौक, छत्रपती शिवाजी महाराज पेठ, बीड रोड काँर्नर , मार्केट यार्ड, तपनेश्वर रोड, खर्डा चौक,नगर रोड, कर्जत रोड, विठाई लाँन्स येथे रँली संपन्न झाली.
‌यावेळी तहसिलदार योगेश चंद्रे व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते ध्वज रोहण करण्यात आला. तसेच जामखेड तालुक्यातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशिद , माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष सलिम बागवान, माजी उपसभापती रवि सुरवसे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, अँड. प्रविण सानप , नगरसेवक अमित चिंतामणी, प्रविण चोरडिया, पोपट राळेभात, प्रा. संजय राऊत सर,पांडूरंग उबाळे, संपत राळेभात, मनोज कुलकर्णी, सोमनाथ राळेभात, सरपंच बापूराव ढवळे, संजय कार्ले ,माजी सैनिक संघटना ता. अध्यक्ष बजरंग डोके, कांतीलाल कवादे ( मेजर) , मोहन (मामा) गडदे, अर्जुन म्हेत्रे, मोहन देवकाते, कल्याण हुलगुंडे , बापू माने, अजय सातव ,डॉ. महेश मासाळ, प्रविण होळकर, सचिन मासाळ, गोरख घनवट, संतोष गव्हाळे, बाबासाहेब फुलमाळी, बिट्टू मोरे, प्रसिद्धी प्रमुख उद्धव हुलगुंडे, नागराज मुरुमकर आदी तसेच माजी सैनिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here