छत्रपती संभाजी महाराज वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे ठरले ‘आयर्नमॅन’

0
187
जामखेड न्युज——
 छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पांडुरंगराव गुरमे यांनी रविवारी युरोपमधील इस्टोनियाची राजधानी टॅलिनमध्ये झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धातला ‘आयर्नमॅन’ हा बहुमान मिळविला.
मागील सुमारे दोन वर्षांपासून ते या स्पर्धेची तयारी करत होते. त्यांनी स्पर्धा ७ तास ४४ मिनिटे एवढ्या वेळात पूर्ण केली.
१.९ किलोमीटर समुद्रात पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर धावणे हे तीनही क्रीडाप्रकार,
साधारण १७ ते १८ अंश सेल्सियस तापमानात एकसलग पूर्ण करावे लागणारी ही जगातील कठिणतम स्पर्धांपैकी एक समजली जाते. 
वाळूज औद्योगिक वसाहतीतील उद्योजक अभिजित नारगोलकर हे गुरमे यांचे ‘कोच’ आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here