लाईटचा करंट लागून पाटोदा येथील तरूण मृत्यूमुखी

0
213
जामखेड न्युज——
  भाकरेवस्ती पाटोदा जिल्हा बीड येथील तरूण विशाल जाधव वय ३० डिश बसवत असताना लाईटचा करंट लागून जागीच मृत्यू झाला यामुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे. 

पाटोदा येथील विशाल जाधव राहणार भाकरे वस्ती हा युवक टिव्ही डिश बसविण्यासाठी इमारतीच्या छतावर गेला असता छताच्या बाजूने जात असलेली मेन विद्युत तार डोक्यावर लागताच विशाल जाधव हा तरुण जागीच मृत्यू झाला

 यामुळे पाटोदा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.विशाल जाधव हा.सतत हसत खेळत राहणारा व सतत मित्राच्या गरड्यात राहत होता. 
रात्री आठच्या दरम्यान मांजरसुंबा रोड येथे एकाजनाचे डिश रिपेरिंग चे काम करण्यासाठी गेला होता.
डिश काम झाल्यानंतर अचानक उभा राहत असताना डोक्यावर मेनलाईन लागल्याने विशाल जाधव वय वर्षे ३० जागीच जळुन मुत्यु झाल्याने पाटोदा शहरात शोकाकुल पसरली असुन पाटोदा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here