सीआरपीएफ मधील सेवा निवृत्त देशसेवक कार्ले यांची जामखेड शहरात भव्य मिरवणूक

0
253
जामखेड न्यूज—–
  एकवीस वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले मेजर नानासाहेब रावसाहेब कार्ले जामखेड शहरात येताच बस स्थानकापासूनच जल्लोषात भव्य दिव्य अशी उघड्या जीपमधून मिरवणूक काढली याप्रसंगी भारत माता की जय, वंदे मातरम, वीर जवान तुझे सलाम, जय जवान जय किसान अशा घोषणांनी जामखेड दुमदुमले 
   भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांनी ग्रामस्थांच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. यावेळी विविध ठिकाणी त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला माजी कृषी अधिकारी व बावीचे चेअरमन सुदंरदास बिरंगळ, वर्धमान मेडिकल, राहुल कन्स्ट्रक्शन चे हवाशेठ सरनोबत, मंगेश ( दादा) आजबे, सिद्धीविनायक कृषी सेवा केंद्र, यांनी विविध ठिकाणी सत्कार केले तरआप्पासाहेब कार्ले, धनंजय कार्ले, संजय कार्ले यांनी खर्डा चौकात सत्कार केला , कृष्णा हॉस्पिटल येथेही सत्कार करण्यात आला. 
    यावेळी नानासाहेब कार्ले यांनी जामखेड न्यूजशी बोलताना सांगितले की मी २१ वर्षे देशातील दुर्गम अशा जम्मू आणि काश्मीर गडचिरोली भागात सेवा केली सेवा करत असताना चित्तथरारक अनुभव शौर्यगाथा सांगत असताना सर्वांचे डोळे पाणावले व अंगावर काटा येत होता व सैनिकांची कथा कधीच निवृत्त होत नसते त्यांच्या रक्तात देशसेवा ही शेवटपर्यंत व शेवटच्या श्वासापर्यंत असते सुरू असलेल्या यापुढे सिव्हिल लाईफ मध्ये हे विधायक व सामाजिक कार्यासाठी मी नेहमी पुढे कार्य करेल असे सांगितले. 
   यावेळी संजय कार्ले, आप्पासाहेब कार्ले, हवा सरनोबत, शरद कार्ले, ज्योतीराम बांदल, बजरंग डोके मेजर पप्पू कात्रजकर, शहाजी गाडे, भरत भोगल, तात्यासाहेब बांदल, पोलीस पाटील निलेश वाघ, नागेश कात्रजकर, गणेश कार्ले, प्रवीण कार्ले, वैभव कार्ले, चंद्रकांत कार्ले, सचिन कात्रजकर, आशिष कार्ले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित आजी माजी सैनिक उपस्थित होते. 

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here