जामखेड न्यूज—–
पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी ( सरदवाडी ) येथील काशिनाथ बापुराव पवार वय ८५ यांचे शनिवारी सकाळी सहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. दहा वाजता सरदवाडी येथील महारदरा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
काशिनाथ पवार हे धार्मिक वृत्तीचे होते पिंपळवंडी व साकत परिसरात त्यांनी अनेक युवकांना भजन शिकवले. त्यामुळे परिसरात चांगली भजनीमंडळे तयार झाली.
त्यांच्या मागे पत्नी, आठ मुली, जावाई, नातू, पनतू, पुतणे असा मोठा परिवार आहे. परिसरात आबा नावाने ते ओळखले जात होते.