जामखेड तालुक्यात भरदिवसा सोन्याच्या व्यापाऱ्यास लुटले परिसरात एकच खळबळ

0
329
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज——
भरदिवसा मोटारसायकलवर पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी दुचाकीवर चाललेल्या सोन्याचे व्यापारी यांच्यावर हल्ला करुन जखमी केले. यानंतर त्यांच्या जवळील सोने व चांदीचा ऐवज आसलेली बॅग पळवुन नेली. भरदिवसा घडलेल्या या थरार नाट्यामुळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड शहरातील शिवाजीनगर भागात रहाणारे सोन्याचे व्यापारी बाळकृष्ण बेद्रे यांचा सोन्याचा व्यावसाय आहे. त्यांचे तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी सोन्याचे दुकान आसल्याने ते त्या ठिकाणी दररोज जामखेड हुन पिंपरखेड या ठिकाणी मोटारसायकलवर जाऊन येऊन करत आसतात. नेहमीप्रमाणे आज दि ६ अॅगस्ट रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास व्यापारी बाळकृष्ण बेद्रे हे जामखेडहुन पिंपरखेड या ठिकाणी काही सोने व चांदीचा ऐवज बॅग मध्ये टाकून मोटारसायकल वर चालले होते. याच दरम्यान चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. व्यापारी हे आय टी आय मार्गे जामखेड – कुसडगाव रोडने जात आसताना काझेवाडी तलावाच्या जवळील वळणावरील पुलाजवळ त्यांची मोटारसायकल चालली होती. याच वेळी पाठीमागून पाळत ठेवलेल्या तीन चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना पाठीमागून कशानेतरी मारहाण करत हल्ला केला.या हल्ल्यात ते मोटारसायकल वरुन खाली पडले व कीरकोळ मार लागला. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या कडे आसलेली सोने व चांदीची बँग घेऊन घटनास्थळाहुन पळ काढला. या घटनेत नेमकी कीती रक्कम गेली आहे याची अद्याप माहिती मिळु शकलेली नाही. यानंतर संबंधित व्यापारी बेद्रे यांनी तातडीने जामखेड पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या बाबत जामखेड पोलीस स्टेशनला फीर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सोन्याचे व्यापारी हे जामखेड या ठिकाणी राहत आहेत व त्यांचे दुकान पिंपरखेड या ठिकाणी आहे. त्यामुळे जामखेड ते पिंपरखेड ते दररोज येऊन जाऊन करतात. याचीच माहिती चोरट्यांनी काढली आसावी व त्यांनी भरदिवसा सकाळी पाळत ठेऊन त्यांना लुटले. भरदिवसा घडलेल्या या थरार नाट्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली आसुन आरोपींच्या शोधासाठी तातडीने पोलिसांची शोधपथक तयार करून पाठवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here