जामखेड न्युज——
बेलापुर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विठ्ठल बाबासाहेब सदाफुले यांनी “अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा ग्रामीण भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासावर झालेला परिणाम”या विषयावर संशोधन करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची “विद्यावाचस्पती” (पीएचडी) पदवी प्राप्त केली.

त्यांना या संशोधनासाठी मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. दिलीप भोईटे सर यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ शिवाजीराव ढगे सर यांनी विशेष सहकार्य केले.डॉ सदाफुले सर हे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या कॉलेज करिअर कट्टा स्पर्धा परीक्षेचे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच महाविद्यालयातील महत्वाच्या विविध समित्यांवर कार्यरत आहेत.

या यशाबद्दल त्यांचे बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथा, हरी नारायण खटोड, अशोक साळुंके, दिपक सिकची, सचिव अॅड.शरद सोमाणी, बापुसाहेब पुजारी, शेखर डावरे, नारायणदास सिकची, सुरेश मुथा, श्रीकृष्ण भालेराव, प्रेमा मुथा, श्रीवल्लभ राठी, हरिश्चंद्र पाटील महाडिक, सुनिता ग्रोवर व कला वाणिज्य महाविद्यालय विकास कमिटीचे चेअरमन राजेश खटोड, सदस्य रविंद्र खटोड, भरत साळुंके, राजेंद्र सिकची, सौ.सुविद्या सोमाणी , अॅड.विजय साळुंके, प्रा.हंबीरराव नाईक तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे प्रा. निजाम शेख प्रा. प्रकाश देशपांडे , डॉ. पवार बी. एन, डॉ. पवार बी .आर. प्रा. काळे विनायक, प्रा.विलास गायकवाड. डॉ. अशोक माने, डॉ. संजय नवाळे. प्रा. सुनील विधाटे प्रा. सतीश पावशे प्रा. चंद्रकांत कोतकर, प्रा. अशोक थोरात,प्रा.रुपाली उंडे, डॉ बाळासाहेब बाचकर, कार्यालयीन अधिक्षक संदेश शाहीर, कृष्णा महाडिक, सौ.अनिता चिंचकर, रामेश्वर पवार, नानासाहेब तुवर, आण्णा ओहोळ, संदीप चौधरी,अनिल पवार व इतर कर्मचारी यांनी तसेच आजी-माजी विद्यार्थी,महाविद्यालयातील विद्यार्थी मित्रमंडळी व ग्रामस्थांनी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.