दहा ते पंधरा जणांकडून युवकांना मारहाण कर्जत शहरात कडकडीत बंद

0
209
जामखेड न्युज——
कर्जत (Karjat ) शहरात प्रतिक उर्फ सनी राजेंद्र पवार (Sunny Rajendra Pawar) या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला. यामध्ये तो गंभीर रित्या जखमी झाला असून त्याला नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. याचे तीव्र पडसाद कर्जत शहरांमध्ये उमटले आहेत. आज शुक्रवारी कर्जत शहरांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला, शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली असून, आठ जणांवर ॲट्रॉसिटीसह भादवी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अमित राजेंद्र माने यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटला आहे की, सनी पवार व मी शहरातील अक्काबाई नगर परिसरामध्ये राशीन येथे अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमास जाण्यासाठी थांबलेलो असताना त्या ठिकाणी दहा ते पंधरा युवकांनी हातामध्ये गज काठ्या हॉकीची स्टिक तलवार यांच्या साह्याने आमच्यावर हल्ला केला. यामध्ये सनी पवार यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. हल्लेखोर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार व बुलेट पल्सर व इतर वाहनांवर आले होती. यावेळी त्यांनी जातीय वाचक शिवीगाळ करून तुला खूप हिंदू धर्माचा किडा आला आहे का असे म्हणून शिवेगाळ करून हातातील तलवारीने वार केले, व तू सारखे सोशल मीडियावर आय सपोर्ट नपुर शर्मा असे स्टेटस ठेवत असतो व इंस्टाग्राम वरही टाकत असतो असे म्हणून तुझा आम्ही उमेश कोल्हे करू असे म्हणाले.
या घटनेनंतर या घटनेचा विविध हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध करीत कर्जत बंद ची हाक दिली होती. त्यानुसार युवकांनी शहरातून मोर्चा काढून पोलीस निरीक्षक यादव यांना निवेदन दिले. यानंतर पत्रकारांना माहिती देताना
दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, हिंदुराष्ट्र सेना जिल्हाध्यक्ष संजय आडोळे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनुसूचित आघाडी सेलचे कार्यकारिणी सदस्य पंडित वाघमारे, यांनी सांगितले की ही घटना निंदनीय आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून नुपूर शर्माच्या संदर्भातील ही घटना असल्याने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.अशी मागणी केली आहे.
ज्यांच्या बाबतीत ही घटना घडली आहे, त्यांच्यात या पूर्वीही भांडणे झाली होती. त्यासंबंधीचे गुन्हे कर्जत पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहेत. त्याच वादातून रात्रीचा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नूपर शर्मा यांचे समर्थन करण्याशी याचा काही संबंध असल्याचे अद्याप तरी नेमकेपणाने स्पष्ट झालेले नाही. मात्र पोलीस संपूर्ण चौकशी करीत आहेत,’ अशी माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, या घटनेची पोलिसांनी दखल घेत चौकशी सुरू केली आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्यात येणार आहे.मात्र, हा प्रकार नुपूर शर्मा यांच्या समर्थनाच्या कारणावरूनच झाला किंवा कसे, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी पवार याचे शहरातील पठाण नावाच्या एका युवकासोबत भांडण झाले होते. मारहाणही झाली होती. त्याचा राग काढण्यासाठी रात्रीचा हल्ला झाला असल्याचेही दुसऱ्या बाजूकडून सांगण्यात येत आहे. रात्री ८ च्या सुमारास शहरातील भांडेवाडी रोडवर ही घटना घडली. तरुणांनी लाकडी दांडग्याने पवार याला मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. मात्र, युवकाचा जबाब नोंदवल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
पोलीस योग्य ती कारवाई करतील. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. नागरिकांनी संयम ठेवावा. ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर कोणतीही जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल असे स्टेटस ठेवू नये असं आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केलं आहे. वरिष्ठ अधिकारीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
कर्जत शहरात जातीय सलोखा कायम राहवा व कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून कर्जत शहरात जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. संवेदनशील वातावरण निर्माण झाले असले तरी तणाव पूर्ण शांतता मात्र कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here