लोकांच्या अडीअडचणीसाठी अहोरात्र उपलब्ध होणारे डॉ. भगवानराव मुरूमकर साकत गटासाठी सर्वात प्रबळ दावेदार हॅलो म्हटले की आलो अशी ओळख

0
319
जामखेड न्युज——
    पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचे गट व गणवार आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. साकत गणात सर्व सामान्य जनतेशी संपर्क असणारे तसेच लोकांच्या अडीअडचणीसाठी चोवीस तास उपलब्ध असणारे हॅलो म्हटले की आलो अशी ओळख असणारे तसेच गटातील रस्ते, वीज व पाणी या मूलभूत समस्या बरोबरच घराघरात वैयक्तिक लाभाच्या योजना पोहोचवणारे डॉ. भगवानराव मुरूमकर हे प्रबळ दावेदार समजले जातात. 
     डॉ भगवानराव मुरुमकर यांनी साकत गणात १५ व्या वित्त आयोगातुन तिनशे बाकडे बसवलेले आहेत त्यामुळे साकत गणातील प्रत्येक गावात बाकडे आले गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त केले आहे. साकत, मोहा, सावरगाव, शिऊर व नाहुली, देवदैठण, धामणगाव, तेलंगशी नंतर आज दिघोळ माळेवाडी येथेही बाकडे बसवलेले आहेत त्यामुळे तेथील लोकांनी समाधान व्यक्त करीत डॉ मुरुमकर यांचा सत्कार केला.
    डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून साकत गणासह तालुक्यात रस्ते, वीज व पाणी या मूलभूत समस्या बरोबरच समाजातील वंचित वंचित घटकाला वैयक्तिक लाभाच्या योजना मिळवून देत
न्याय मिळवून दिलेला आहे. पाच वर्षे पंचायत समितीचे सभापती व पाच वर्षे सदस्य असताना वैयक्तिक लाभाच्या विहिरी, शेततळे, फळबाग, गायगोठा शेड अशा विविध वैयक्तिक लाभाच्या योजना वंचित व गरजू मिळवून दिल्या आहेत. 
 तसेच साकत येथील विठ्ठल मंदिराचा वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश  करण्यासाठी प्रयत्न केला. यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला तसेच नायगाव व देवदैठण येथील मंदिरांचा समावेश केला वर्ग तीर्थक्षेत्रात झाला आहे लवकरात लवकर निधी प्राप्त होईल. 
गटातील वाड्या वस्त्या पक्या रस्त्याने जोडल्या पिंपळवाडी फाटा ते कोल्हेवाडी, नाहुली ते वांजरा फाटा, सावरगाव ते शिऊर, शिऊर ते  घाटेवाडी , फाळकेवाडी बसरवाडी, दिघोळ ते माळेवाडी, नायगाव ते उगलेवस्ती, सतेवाडी ते राजुरी, शिऊर ते बिंदू वस्ती या सह अनेक रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावले . तसेच कोरोना काळात जनतेला धीर देण्यासाठी दवाखान्यात रूग्णांची भेट घेऊन मानसिक आधार दिलाबेड आंक्सीजन  उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केला. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुमारे पस्तीस हजार आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटल्या. यामुळे संपुर्ण तालुक्यात एक सर्वसामान्यांचा नेता अहोरात्र उपलब्ध होणारा अशी ओळख डॉ. भगवानराव मुरूमकर यांची आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत साकत गटात सर्वात प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here