लग्नानंतर तीनच महिन्यात शिक्षकाच्या पत्नीची आत्महत्या पतीसह चार जणांवर जामखेड पोलिसात गुन्हा दाखल

0
383

जामखेड न्युज——

लग्नाला आवघे तीनच महीने झाले, नव्याचे नऊ दिवस संपत नाहीत तोच माहेरुन दहा लाख रुपये आणावेत या मागणीसाठी होत आसलेल्या छळास कंटाळून शिक्षकाच्या पत्नीने आत्महत्या करुन आपली जिवनयात्रा संपवली त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

 

मयत अंकीता सुनिल डोईफोडे आसे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. या घटने प्रकरणी अंकीताचा भाऊ स्वप्निल उत्तमराव केदार रा. समर्थ नगर, म. पो. ता. केज. जिल्हा. बीड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक पती सचिन सुनिल डोईफोडे, कुसुम सुनिल डोईफोडे, सुनिल दादाराव डोईफोडे, नितीन सुनिल डोईफोडे सर्व. रा. वडवणी ता. वडवणी. जिल्हा. बीड. (कायम रहाणार, फक्राबाद, ता. वाशी) या चार जणांच्या विरोधात आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत अंकीता सुनिल डोईफोडे हीचे तीन महीन्यापुर्वीच लग्न झाले होते. लग्नानंतर ती आपल्या सासरी वडवणी जिल्हा बीड व शिवाजी नगर, जामखेड या ठिकाणी नांदत होती. मयत अंकीता पती हे जामखेड येथे शिक्षक पदावर नोकरी करत आहेत. लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस संपत नाहीत तोच अंकीता हीचा दि २४ एप्रिल २०२२ ते २२ जुलै २०२२ पर्यंत सासरकडील लोकांनी छळ सुरू केला. माहेरुन तुझ्या बापाकडुन जामखेड येथे घर विकत घेण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन ये आसे म्हणून तीला उपाशीपोटी ठेऊन तीला शिवीगाळ व मारहाण करण्यात येत होती आसे दिलेल्या फिर्याद म्हंटले आहे. याच मागणीला कंटाळून अंकीता हीने आत्महत्या करुन आपली जिवनयात्रा संपवली. या प्रकरणी मयत अंकीताचा भाऊ स्वप्निल केदार याने दिलेल्या फिर्यादीवरून वरील चार जणांच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here