जामखेड न्युज——
महाराष्ट्रात सरकार कोणाचेही असो कर्जत जामखेडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही सध्या सर्वच मतदारसंघातील कामे थांबवण्यात आलेली आहेत. ती लवकरात लवकर सुरू होतील. मतदारसंघाच्या विकासासाठी मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटलो आहे त्यांनी सकारात्मक दृष्टीकोन दाखविलेला आहे. असे आनंद नगरीची पाहणी करताना आमदार रोहित पवारांनी पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केले.

यावेळी कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश जरे, सचिव वाहेदभाई सय्यद, पवनराजे राळेभात, त्रिंबक कुमटकर, संजय चौधारा, मारुती काळदाते, राहुल बेदमुथ्था, शरद शिंगवी, विजय कोठारी, दादा उगले, मोहन पवार, अमोल गिरीश, अमोल लोहकरे, अमित जाधव, निखिल घायतडक, विकास राळेभात, नासीर सय्यद यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार पवारांनी सांगितले की, विकासाचे श्रेय घेण्याचा विरोधक प्रयत्न करतील पण जनतेला माहीत आहे की विकास कोणी केला आहे निधी कोणी आणला आहे. विरोधकांना जनताच उत्तर देईल.

आमचे सरकार असतानाही तसेच मी पवार कुटुंबातील सदस्य असतानाही कर्जत जामखेडच्या विकासासाठी प्रत्येक अधिकार्यांसमोर बसून कामे मंजूर करून आणली पुढेही आणणारच आहे. कसलाही निधी कमी पडू देणार नाही.









