जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक  2022 आरक्षण सोडत जाहीर पहा जामखेड मधील तीन्ही गटाचे आरक्षण

0
273
जामखेड न्युज——
      जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२२ साठी आरक्षण सोडत कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता .त्यानुषंगाने जामखेड तालुक्यातील ३ गटासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे  आणि ६ गणासाठी जामखेड तहसील कार्यलय येथे  आज आरक्षण सोडत पार पाडण्यात आली . यासाठी माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाने श्री संदीप चव्हाण उपजिल्हाधिकारी भुसंपादन क्रमांक 1 यांची नियंत्रक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती .ते या सोडतीसाठी उपस्थित होते . 
   सर्व उपस्थितांच्या समोर आरक्षण सोडत बाबत मार्गदर्शन करून सकळी ११ वाजत पंचायत समितीच्या ६ गणांसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम पार पाडण्यात आला . जामखेड तालुक्याला एकुण ६ जागांपैकी १ जागा अनुसूचित जातीकरिता ,अनुसूचित जमातीकरिता ० जागा ,नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी १ जागा  , सर्वसाधारण महिला साठी 1, जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 3 जागा देण्यात आलेल्या होत्या. त्यानुषंगाने अनुसूचित जातीकरिता १ जागा हि महिला राखीव असल्याने आणि शिऊर या गणामध्ये सर्वात जास्त अनुसूचित जातीची संख्या असल्याने त्या ठिकाणी तो गण अनुसूचित जाती महिला करिता आरक्षित करण्यात आला . 
नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी प्रभाग रचना पूर्णपणे बदलल्याने आणि त्यानंतर प्रथम निवडणूक असल्याने नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यामध्ये माननीय निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार चिट्ठी टाकून सोडत करण्यात आली. नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी २७ % आरक्षण देण्यात आले होते त्यानुषंगाने माननीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे १ जागा देण्यात  आलेली आहे . यात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १.६२ जागा येतात परंतु निवडून आयोगाच्या सूचनेप्रमाणे ज्या ठिकाणी २७% आरक्षण देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी अपूर्णांक  वगळण्यात यावा असे असल्यामुळे नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी १ जागा आरक्षित करण्यात आली आहे.  
   या सोडतीमध्ये ती जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करिता सोडत चिट्ठीने देण्यात आली त्यामध्ये अरणगाव ,जवळा आणि नान्नज या गणामध्ये सोडत चिट्ठीद्वारे जवळा  हा प्रवर्ग आल्यामुळे त्यासाठी ही जागा  आरक्षित आकारण्यात आली. त्यानुषंगाने सोडत प्रक्रिया करून जवळा  हा गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करिता  राखीव करण्यात आला . सर्वसाधारण महिलेसाठी नान्नज गण थेट आरक्षित  करण्यात आला .  सर्वसाधारण प्रवर्गासाठी शिल्लक्  गन् अरणगाव, खर्डा , साकत हे गण आरक्षित करण्यात आले . आरक्षण सोडत करताना मागील 2002,2007,2012,2017 मधील आरक्षणाचा माननीय निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे आरक्षण ठरवण्यात आलेले आहे.
     अशाप्रकारे खालीलप्रमाणे जामखेड पंचायत समिती साठी  ६ गण हे आरक्षित करण्यात आले आहेत 
पंचायत समिती गण आरक्षण 
१. १६५ साकत गण – सर्वसाधारण 
२. १६६ शिऊर गण – अनुसूचित जाती स्त्री 
३. १६७ जवळा गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री 
४. १६८ अरणगाव गण – सर्वसाधारण 
५. १६९ खर्डा गण – सर्वसाधारण 
६. १७० नान्नज गण – सर्वसाधारण स्त्री
अशा प्रकारे आरक्षण प्रक्रिया पार पाडण्यात आली.यावर हरकत घेण्यासाठी दिनांक 29/7/2022 ते 2 /8/2022 पर्यंत मुदत आहे.या मुदतीत ज्यांना हरकत् आहे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपल्या हरकती नोंदवाव्यात.
तहसीलदार जामखेड
    जिल्हा परिषद तीन्ही गटाचे आरक्षण
जामखेड जिल्हा परिषद गट आरक्षण 
83 साकत – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
84 जवळा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
85 खर्डा – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here