Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या राज्यस्तरीय वुशु स्पर्धेसाठी आयडियल स्पोर्टस्, अकॅडमी जामखेडच्या 7 खेळाडूंची निवड

राज्यस्तरीय वुशु स्पर्धेसाठी आयडियल स्पोर्टस्, अकॅडमी जामखेडच्या 7 खेळाडूंची निवड

0
281
जामखेड न्युज——
           ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशन च्या मान्यतेने अ.नगर जिल्हा अमॅचूअर वुशु संघटनेच्या वतीने  तालूका क्रीडा संकुल,पारनेर येथे नुकत्याच जिल्हास्तरीय ज्युनियर व सिनियर वुशु अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाल्या.
           या स्पर्धेमध्ये  आयडियल स्पोर्टस् अकॅडमी जामखेड च्या खेळाडूंना 7 सुवर्ण व 2 रौप्य पदक मिळाले.
ज्युनियर गटामध्ये सुवर्णपदक विजेते-कु.दीक्षा पंडित,
 कु.पूजा जाधव,कु.कोमल डोकडे,रोहित थोरात,जय जाधव रौप्य पदक विजेते-आदित्य जायभाय सिनियर गटामध्ये सुवर्ण पदक विजेते-संदीप जायभाय,शादाब शेख, रौप्य पदक विजेते-महेश कुमटकर  सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची निवड दि.8 ते 11 ऑगस्ट रोजी आत्मा मलिक कोकंमठाण येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वुशु अजिंक्यपद स्पर्धेसाठी झालेली आहे.
        या सर्व खेळाडूंना नगर जिल्हा वुशु संघटनेचे सचिव ,आंतरराष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय प्रशिक्षक लक्ष्मण उदमले व उपाध्यक्ष शाम पंडित यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या सर्व खेळाडूंचे मा.जि.प.सदस्य प्रा.मधुकर राळेभात,उमेश देशमुख यांनी हार्दिक अभिनंदन केले व राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!