जामखेड मध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

0
203
जामखेड न्युज——                   
  जामखेड ता.वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक जिल्हा अध्यक्ष प्रतीक दादा बारसे यांच्या उपस्थितीत पार पडली.बौद्ध विहार, बाजारतळ येथे बहुसंख्येने कार्यकर्ते व इच्छुक उमेद्वार उपस्थित होते.  
                               ता.कार्यकारीणी, इच्छुक उमेद्वारी ज्यांना हवी आहे त्यांच्या मुलाखती,जि. प.गट वाईज बांधणी असे विषय ठले होते.प्रथमतः लोक अधिकार आंदोलन संघटनेचे बापु ओहोळ यांनी प्रस्तावना केली. बैठकीचा उददेश मांडला.           
     त्यानंतर जि. सल्लागार जीवन पारधे गुरुजींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.इच्छुक उमेद्वारांनी लोकांच्या सतत संपर्कात राहिले पाहिजे.त्यांच्या सुख दुःखात सामील झाले पाहिजे.तरच तो उमेद्वार निवडून येऊ शकतो.अशांनीच उमेद्वारी करावी.अशी मांडणी केली.जि. संघटक भीमराव चव्हाण यांना बैठकीचे अध्यक्ष करण्यात आले होते.
जिल्हा अध्यक्ष बारसेंनी त्यांच्या मनोगतात कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना केल्या.अजूनही या तालुक्यात सभासद नोंदणी झाली नाही.सभासद नोंदणी करा,मगच उमेद्वारीचा विचार होईल.लोकांतला संपर्क वाढवणे,त्यांचे छोटे छोटे प्रश्न सोडवणे, अशी कामे झाली पाहिजेत.आपण फार श्रीमंत नाहीत ,मते विकत घ्यायला.मग लोकांच्या प्रश्नांवर लढा उभा करून ते कसे सुटतील यावर लक्ष घालणे महत्वाचे आहे.यावेळी जि. महासचिव योगेश साठे,जि. संघटक धनश्री शेंडगे,जि. सल्लागार जीवन पारधे गुरुजी , जिल्हा उपाध्यक्ष योगेश सदाफुले, जिल्हा संघटक भीमराव चव्हाण हे सर्व उपस्थित होते. सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अजिनाथ शिंदे यांनी केले. ता.अध्यक्ष आतिष पारवे,शहर अध्यक्ष आजीनाथ शिंदे यांनी बैठकीची चोख व्यवस्था केली होती.महामानवाला पुष्प अर्पण करून बैठक दुपारच्या 4 वाजेपर्यंत चालली.यावेळी महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.आजीनाथ शिंदे यांनी सूत्र संचलन केले व बाळासाहेब सदाफुलें यांनी आभार मानले.                    
          इच्छुकांच्या मुलाखती पुन्हा घेतल्या जातील व कार्यकारणी नंतर तयार केली जाईल, जो माणसे जोडील व मतदान वाढविल अशा लोकांचा विचार निश्चित होइल.यानंतर वंचित बहुजन आघाडी ही बहुजनांची राजकीय संघटना आहे. आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकर  यांच्या आदेशनेच मी काम करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहोत. आणि  बाळासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्ते आहोत. यापेक्षा कुठले पद मोठे आहे. आपण सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे. यावेळी असे मत बारसेंनी व्यक्त केले.तालुका उपाध्यक्ष गणेश,द्वारका पवार घायतडक, सुधीर कदम विशाल पवार, मोहन शिंदे, भीमराव सुरवसे, गणपत कराळे, नितीन आहेर, लखन जाधव, सुदाम शेगर, अर्जुन सावंत, कल्याण भाऊ आव्हाड, दिनेश ओहोळ, पप्पू सदाफुले, बौद्ध महासभेच्या सुरेखाताई सदाफुले, वनिताताई सदाफुले, राजू शिंदे, संतोष चव्हाण, सागर ससाने, सुरज बिरलिंगे हे सर्व उपस्थित होते अशी माहिती शहर अध्यक्ष अजिनाथ शिंदे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here