जामखेड प्रतिनिधी
26 जुलै कारगिल विजय दिवस दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवनेरी अकॅडमी जामखेड येथे साजरा करण्यात आला.या कारगिल युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी तब्बल पावणे तीन महिने पाकिस्तान च्या सैनिकांशी झुंज दिली शेवटी भारतीय सैनिकांचा आणि भारताचा विजय झाला हा विजय दिवस संपूर्ण भारत भर कारगिल विजय दिवस म्हणून साजरा होतो हा विजय दिवस जामखेड मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.

शिवनेरी अकॅडमी सैनिक घडवण्याचे काम करते आता शिवनेरी अकॅडमी मध्ये 100 विध्यार्थी व विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत यामध्ये आर्मी नेव्ही पोलीस दलामध्ये 158 विध्यार्थी सेवेत रुजू झाले आहेत याचबरोबर शिवनेरी अकॅडमी शिकुरिटी गार्ड पण पुरवण्याचे काम करत आहे
यावेळी कु.नीता ननवरे,कु हर्षदा सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले.

या कारगिल विजयाचे औचित्य साधून आजी माजी सैनिक त्रिदल संघटना स्थापन केली आहे या संघटनेच्या अध्यक्ष पदी कॅप्टन लक्ष्मण भोरे,उपाध्यक्ष कांतीलाल कवादे, सचिवपदी शहाजी ढेपे, कार्यकारी सल्लागार कॅप्टन किसन चिलगर, सहसचिव शांतीलाल जायभाय, कोषाध्यक्ष राजकुमार भराटे,प्रवक्ता केशव गोपाळघरे,संघटक रवींद्र शेळके,मार्गदर्शक विठ्ठल लेकुरवाळे,संचालक रामचंद्र वाळुंजकर, हरिभाऊ कदम,रावसाहेब कापसे, यांची निवड करण्यात आली.

याचबरोबर वीरनारी मनीषा काकडे,मंगल जायभाय, निर्मला टेकाळे, संगीता घोलप,आणि बुजुर्ग सैनिकांचा ही सन्मान करण्यात आला यामध्ये बळीराम ढाळे, उद्धव बिरंगळ, पुंडलिक अडाले यावेळी अध्यक्ष त्रिदल संदीप भाऊ लगड, कोषाध्यक्ष अंकुश खोटे, कार्यध्यक्ष नवनाथ मोहिते, तहसीलदार योगेश चंद्रे, बीडीओ प्रकाश पोळ,उद्योगपती रमेश गुगळे, प्रा.मधुकर राळेभात,कृषिअधिकारी राजेंद्र सुपेकर,पोलीस उपअधीक्षक थोरात साहेब,पोलीस उपअधीक्षक मोहिते साहेब,संजय हजारे,अमित जाधव, तसेच जामखेड,आष्टी,पाटोदा तालुक्यातील आजी माजी सैनिक,सैनिक महिला,उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवनेरी अकॅडमी च्या विध्यार्थी व विद्यार्थिनी मेहनत घेतली