जामखेड न्युज——
सन २०२०-२०२१ मध्ये शेतकऱ्यांनी अल्प मुदत पीक कर्ज घेवून परतफेड केलेल्या पीक कर्जाचे व्याज शासनाकडून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावे यासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री.अमोलजी राळेभात साहेब यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता.

त्यांनी शासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून सन २०२०-२०२१ मधील ज्या सभासदांनी घेतलेल्या पीक कर्जाची सव्याज परतफेड केलेली आहे.अशा सभासदांचे केंद्र शासनाचे व्याज प्राप्त झाले असून सभासदांच्या बचत खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया चालू आहे.

याबाबत जामखेड तालुक्यासाठी सन २०२०-२०२१ मधील दि. ३०/०६/२०२१ अखेर परतफेड केलेल्या १४५९७ सभासदांचे २ कोटी ०१ लाख ८१ हजार ७७५ रुपये व्याज केंद्र शासनाकडून प्राप्त झाले असून सदरील रक्कम तत्काळ जमा करण्याची कार्यवाही जिल्हा बँक शाखेमार्फत चालू झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्याना नागपंचमी हा सण आनंदाने साजरा करता येणार आहे.*
*त्याचप्रमाणे मागील वर्षी एकरी २०००० याप्रमाणे कर्ज वितरण करण्यात आले होते त्यामध्ये शेतकऱ्याच्या मागणीनुसार या वर्षी संचालक मंडळाने एकरी १०००० वाढ करून एकरी ३०००० या प्रमाणे बँकेने तालुक्यातील ८ शाखा व ४८ प्राथमिक सेवा सोसायट्यामार्फत जून २०२२ अखेर जामखेड तालुक्यात अल्प मुदत कर्जापोटी १४७३५ सभासदांना १४५ कोटी ५० लाख कर्ज वाटप केलेले आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचा वेळेवर भरणा करून शासनाच्या ३ लाख व बँकेच्या ३ ते ५ लाख व्याज सवलत योजनेचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन संचालक अमोलजी राळेभात साहेब यांनी केले.

तसेच सन २०२०-२०२१ काळातील राज्य शासनाचे व्याजही लवकरात लवकर मिळणेसाठी शासन स्तरावर पाठपुरावा चालू असून ते देखील सभासदाच्या बचत खाती लवकरच जमा होईल असा विश्वास अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे युवा संचालक श्री.अमोलजी राळेभात साहेब यांनी व्यक्त केला.