जामखेड न्युज——
सामाजिक उद्देश समोर ठेवून जामखेड तालुक्यात मिडिया क्लबची स्थापना करण्यात आली आहे. मिडिया क्लबच्या सदस्यांचा शहरात विविध संघटनांनी सत्कार केला आता ग्रामीण भागातही सत्कार सुरू झाले आहेत. तालुक्यातील पाटोदा गरड येथे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते गफार पठाण मित्रमंडळाच्या वतीने मिडिया क्लबच्या सदस्यांचा भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अकरा तोफांची सलामी देत स्वागत करण्यात आले.

यावेळी जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, उपाध्यक्ष अशोक वीर, सचिव सत्तार शेख, सहसचिव पप्पूभाई सय्यद, कार्याध्यक्ष दत्तात्रय राऊत, ज्येष्ठ पत्रकार फायकअली सय्यद, प्रसिद्धी प्रमुख धनराज पवार, अविनाश बोधले, किरण रेडे यांच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच गफार पठाण यांनी सांगितले की, आमच्या परिसरातील दीनदलित, गोरगरीब, वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मिडिया क्लबचे खुप सहकार्य असते आमच्या परिसराती अडीअडचणी शासन दरबारी मांडण्याचे काम निर्भीडपणे मिडिया क्लब करत आहे यामुळेच आम्ही ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी मिडिया क्लबचे मार्गदर्शक फायकभाई सय्यद, कार्याध्यक्ष दत्तात्रय राऊत, अध्यक्ष सुदाम वराट, उपाध्यक्ष अशोक वीर, सचिव सत्तार शेख, सहसचिव पप्पूभाई सय्यद, अविनाश बोधले, किरण रेडे, प्रसिद्धी प्रमुख धनराज पवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली.