जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
नायगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बसरवाडी, या शाळेने स्वछ विद्यालय पुरस्कार सन 2022 या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.एक छोट्या वाडीवर असलेल्या शाळेला हा बहुमान मिळतो हे आमच्या नायगाव केंद्रासाठी अभिमानास्पद आहे.


या उत्तुंग यशाबद्दल नायगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमान किसन वराट सर यांनी नायगाव केंद्राच्या वतीने या तिन्ही शाळेतील गुणवंत गुरुजनांचा सत्कार केला.या वेळी केंद्रातील सर्व शिक्षक /शिक्षिका उपस्थित होते.
एकनाथचव्हाण सर, श्री. घुमरे सर ,श्रीमती पवार मॅडम,श्रीमती गाडवे मॅडम,श्रीमती शेंगडे मॅडम या सर्व सत्कारमुर्तींचे केंद्राच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.